आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्लायडर बॉम्बचे परीक्षण यशस्वी, 100km आहे रेंज; लवकरच होणार वायुदलात दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डीआरडीओने तिसऱ्यांदा ग्लायडर बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली. - Divya Marathi
डीआरडीओने तिसऱ्यांदा ग्लायडर बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली.
जोधपूर - डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी देशात बनलेल्या एका खास प्रकारच्या बॉम्बचे शुक्रवारी यशस्वी परीक्षण केले. हा बॉम्ब फायटर प्लेनमधून डागल्यावर 100 किमी अंतरावरील आपल्या लक्ष्यावर अचूक निशाणा साधू शकतो. या ग्लायडर बॉम्बच्या मदतीने आपले फायटर प्लेन शत्रूच्या हद्दीत गेल्याशिवाय त्यांचा परिसर बेचिराख करू शकतात. तीन यशस्वी परीक्षणांनंतर आता हे ग्लायडर बॉम्ब या वर्षाच्या अखेरपर्यंत वायुदलात दाखल होतील.
 
4 वर्षांपूर्वी सुरू झाले होते काम
 
ग्लायडर बॉम्बची वैशिष्ट्ये
इंडियन एअरफोर्ससाठी बनलेला हा बॉम्ब खूपच फायदेशीर सिद्ध होतोय. याच्या मदतीने फायटर एअरक्राफ्ट शत्रूच्या धोकादायक हद्दीत गेल्याशिवाय त्याला बेचिराख करू शकतील. यामुळे फायटर प्लेनचे नुकसानही होणार नाही.
 
असे काम करतो ग्लायडर बॉम्ब...
- ग्लायडर बॉम्बमध्ये विस्फोटकाशिवाय 4 इतर भाग असतात. यात एक इलेक्ट्रॉनिक सेंसर सिस्टिम, कंट्रोल सिस्टिम, कंट्रोल करता येणारे पंखे आणि एक बॅटरी असते.
- फायटर प्लेनमधून सोडताच हा बॉम्ब एका ग्लायडरप्रमाणे आकाशात मार्गाक्रमण करतो. यात मिसाइलप्रमाणे गती देण्याची कोणतीही व्यवस्था नसते, परंतु वेगवान फायटरमधून सोडल्यामुळे हा गती पकडतो. यात लावलेले पंखे ग्लायडर बॉम्बला खाली पडू देत नाहीत आणि एकसमान लेव्हलवर पुढे जात राहतो.
- बॉम्ब हवेत उडताना कंट्रोल रूममधून याला डायरेक्शन दिले जाते. यात लावलेले सेन्सर टारगेटची ओळख पटवतो आणि याची कंट्रोल सिस्टिमला माहितीही देतो. बॉम्बची कंट्रोल सिस्टिम त्याची दिशा वळवण्याचे काम करते. यातील बॅटरीमुळे चालणाऱ्या पंखांनी याची दिशा टारगेटकडे वळवली जाते.
- टारगेटवर पोहोचताच याचे पंख बंद केले जातात. आणि यात विस्फोट होऊन लक्ष्याचा नायनाट होतो. या बॉम्बमुळे मोठा विध्वंस होऊ शकतो.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...