आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम रहीमचा खास चेला अरेस्ट, जेलमधून या मास्टरमाइंडसोबत गेली होती हनीप्रीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राम रहीम, हनीप्रीत आणि प्रकाश. - Divya Marathi
राम रहीम, हनीप्रीत आणि प्रकाश.
चंदिगड - पंचकुलामध्ये हिंसा भडकावण्याचा मुख्य आरोपी प्रकाश ऊर्फ विक्कीला मुकेश मल्होत्रा यांच्या SITने मोहालीतून अटक केली आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, 25 ऑगस्ट रोजी रात्री रोहतकच्या संजय चावलाच्या माध्यमातून हनीप्रीतला जेलमधून घरी आणि गोहाना रोडपर्यंत मदत मिळाली होती. रोहतकच्या डेऱ्याचा नंबरदार प्रदीप आणि नंद कुमार हनीप्रीतला घेऊन गेले होते. पंचकुलामध्ये झालेल्या हिंसेच्या दिवशी डॉ. आदित्य इन्साला पाहण्यात आले होते.
 
असे आहे पूर्ण प्रकरण...
- पंचकुलाच्या पिंजौरमधून शनिवारी संध्याकाळी एसआयटीने विजय नावाच्या एका व्यक्तीला अटक केली. शनिवारीच पोलिसांनी हनीप्रीतसह राजस्थानात राहणाऱ्या आरोपी प्रदीप गोयलला उदयपुरात अटक केली होती. याआधी पोलिसांनी राम रहीमचा ड्रायव्हर हरमेल सिंहलाही अटक केली आहे.
- पोलिसांनी आरोपी प्रकाश आणि विजयला रविवारी कोर्टात सादर केले, येथे त्यांना 5 दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. पंचकुलामध्ये 25 ऑगस्ट रोजी उडालेल्या हिंसेतील मुख्य आरोपी प्रकाश तेव्हापासून फरार होता. हिंसेमागचा मास्टरमाइंड प्रकाश ऊर्फ विक्कीच असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु एसआयटीने त्याला शिताफीने अटक केली. 
- बाबाला शिक्षा सुनावल्यानंतर तुरुंगापर्यंत हनीप्रीतने त्याची हेलिकॉप्टरमधून साथ दिली. यानंतर हनीप्रीतला या प्रकाश ऊर्फ विक्कीने गाडी करून दिली. त्यानंतर हनीप्रीत उदयपुरात प्रदीप गोयलसोबत राहत होती. प्रदीपला अटक केल्यावर त्याने हनीप्रीत नेपाळमध्ये पळून गेल्याचा खुलासा केला.
 
डेराभक्त प्रदीपला उदयपुरातून अटक
- पोलिस सूत्रांनुसार, प्रदीप गोयल हरियाणाचाच राहणारा आहे, परंतु राम रहीमच्या आदेशावरून तो उदयपूरमध्ये राहत होता. चौकशीसाठी त्याला पोलिसांनी पंचकुला नेले आहे.
- हरियाणा पोलिसांना माहिती मिळाली होती की, हनीप्रीत मागच्या अनेक दिवसांपासून उदयपुरात राहत आहे. तेथील सेलेब्रेशन मॉलमध्ये प्रदीपसह तिची लोकेशनही ट्रेस झाली होती.
- याआधारेच तिथे पोलिस गेले, परंतु हनीप्रीत आढळली नाही, प्रदीप मात्र अलगद जाळ्यात अडकला. त्याने सांगितले की, हनीप्रीत नेपाळमध्ये पळून गेली आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा आणखी फोटो...
बातम्या आणखी आहेत...