आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुबईहून आला होता नवरदेव, सप्‍तपदीही झाली; पोलिसांनी ऐनवेळी यामुळे केली एंट्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड- पंजाबमध्‍ये फतेहगढ साहिब जिल्‍ह्यात एका 15 वर्षीय मुलीचा दुबई रिर्टन मुलाशी विवाह लावण्‍यात आला. मात्र विवाह झाल्‍यानंतर मुलीला सासरी पाठवण्‍याआधीच विवाहस्‍थळी पोलिस पोहोचले. 


पोलिसांना अशी मिळाली माहिती 
- मुलीकडील एक नातेवाईकच या विवाहाच्‍या विरोधात होता. त्‍यांनीच याची माहिती 'वुमन अँड चाईल्‍ड हेल्‍पलाईन' 181ला दिली. 
- या हेल्‍पलाईनने मूलीच्‍या शाळेमधून तिचा वयाबाबतचा पुरावा मिळवला. 
- यांनतर पंजाब आणि चंदीगढच्‍या संबंधित अधिका-यांनी या प्रकरणी कारवाई केली. 
- मुलीला सासरी पाठवण्‍याआधीच पोलिसांनी हस्‍तक्षेप करत मुलीला जाण्‍यापासून रोखले. 


पुन्‍हा शाळेत जात आहे मुलगी 
- याप्रकरणी फतेहगढ पोलिस ठाण्‍यात एफआयआयर दाखल करण्‍यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे. 
- पोलिस योग्‍यवेळी घटनास्‍थळी पोहोचली असली तरी विवाह झालेला असल्‍यामुळे त्‍यांनी तेव्‍हाच कोणावर कारवाई केली नाही. 
- हेल्‍पलाईनने मुलीच्‍या कुटुंबाची काउंसिलिंगही केली आहे, जेणेकरुन भविष्‍यात त्‍यांनी पुन्‍हा असे पाऊल उचलू नये. 


पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, कसा ठरला मुलीचा विवाह... 

बातम्या आणखी आहेत...