आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंपरा: खुलेआम सेक्ससाठी आईच करते मुलींना प्रवृत्त, 200 रुपयांत विकतो देह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांछडा समुदायात खुलेआम देहविक्री सुरू असते. येथील तरुणी नटूनथटून हायवेवर उभ्या असतात. - Divya Marathi
बांछडा समुदायात खुलेआम देहविक्री सुरू असते. येथील तरुणी नटूनथटून हायवेवर उभ्या असतात.
नीमच - मध्य प्रदेशातील एक समुदाय असा आहे जेथे खुलेआम देहविक्रयाचा बाजार भरतो. हायवेवर या समुदायातील मुली नटूनथटून उभ्या राहतात आणि 200 रुपयांत आपला देह विकतात. अनेकदा तर आईही आपल्या मुलीसाठी ग्राहक शोधत असते. आणि तिच्यासमोर मुली परपुरुषाशी संबंध बनवतात. या वातावरणाला बदलण्यासाठी आता एक IPS पुढाकार घेत आहेत.
  
असे आहे प्रकरण...
- मध्य प्रदेशातील एक असा भाग आहे, जेथे एका विशिष्ट समुदायातील मुली देहविक्रीसाठी मजबूर होतात.
- येथे मुलींना स्वत: त्यांचे आईवडील वेश्यावृत्तीच्या अंधारात लोटतात.
- वास्तविक, राजस्थानला लागून असलेल्या सीमेवरील जिल्ह्यात बांछडा समुदायातील तांड्यांवर खुलेआम देहव्यापार सुरू असतो.
- नीमच, मंदसौर आणि रतलाम जिल्ह्यातील 65 गावांत देहव्यापाराचे असे 250 अड्डे आहेत. देशाचा हा परिसर वेश्याव्यवसायासाठी बदनाम आहे.
- येथे आई आणि वडिलांसमोर मुली वेगवेगळ्या पुरुषांशी संबंध बनवतात. अनेकदा तर मायबापही मुलींसाठी ग्राहक शोधतात.
- बांछडा समाजातील अनेक मुली अशा आहेत ज्यांना या दलदलीतून बाहेर यायचे आहे, परंतु दहशतीमुळे त्यांना तसे करता येत नाही.
- शासनाने शतकांपासून देहव्यापाराशी जोडलेल्या या समाजाला या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी अनेक योजना बनवल्या, परंतु यश आलेले नाही.
 
लोक पुढे येत आहेत...
- आता बांछडा समुदायावरील कलंक मिटवण्यासाठी आणि समाजातील अनेक तरुण-तरुणींना नवी दिशा दाखवण्यासाठी नीमचचे एसपी तुषारकांत विद्यार्थी यांनी पुढाकार घेतला आहे.
- शेतकरी आंदोलनानंतर येथे जॉइन झालेल्या तुषारकांत यांनी अगोदर बांछडा समुदायातील समस्या जाणून घेतल्या. आता स्वयंसेवी संघटनांच्या मदतीने येथे सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
- येथील तरुणांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे काम प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमातून केले जात आहे.
- पोलिसांच्या या शिबिरांत बाछडा समाजातील तरुणही मोठ्या संख्येने येत आहेत. हे सुधारणा होत असल्याचे चांगले संकेत असल्याचे पोलिस म्हणाले.
 
हुंड्यामध्ये 15 लाख रुपये देणे सक्तीचे
- भारतीय समाजात आजही मुलीला नकोशी समजले जाते, परंतु बांछडा समुदायात मुलगी जन्मल्यावर आनंदोत्सव साजरा केला जातो.
- मुलीच्या जन्मावर मोठा खर्च केला जातो, कारण मुलगी मोठी होऊन त्यांच्या कमाईचे माध्यम होते.
- या समुदायातील मुली देहव्यापार करतात, तर मुले चोरी करण्यात पटाईत असतात. या सर्वाला ते आपल्या परंपरेचा भाग मानतात.
- या समुदायात जर एखाद्या मुलाला करायचे असेल तर त्याला हुंड्यात 15 लाख देणे सक्तीचे असते.
- यामुळे बांछडा समुदायातील बहुतांश मुले बिनलग्नाचेच राहतात.
- अफूचा गोरखधंदाही जोरात चालतो. रतलाम, नीमच आणि मंदसौरवरून जाणाऱ्या या हायवेवर बांछडा समुदायातील तरुणी खुलेआम देहव्यापार करतात.
- बांछडा समुदायाची उत्पत्ती कशी झाली, याबद्दल स्पष्टता नाही. असे मानले जाते की, सुमारे 150 वर्षांपूर्वी इंग्रजांनी त्यांना नीमचमध्ये तैनात असलेल्या आपल्या सैनिकांच्या वासनापूर्तीसाठी आणले होते. यानंतर ते नीमचशिवाय रतलाम आणि मंदसौरमध्येही पसरले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...