आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG! रोज वेगळ्या ब्रँडची दारू पितो हा 21 कोटींचा रेडा, मालकाला कमावून देतो 90 लाख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फरिदाबाद - याचे वय 8 वर्षे 4 महिनेच आहे. नाव आहे सुलतान. याचा आहार आणि शौक ऐकून तुम्ही चकितच व्हाल. संध्याकाळच्या जेवणाअगोदर रेडा 100 मिली स्कॉच पितो. मंगळवारी मात्र या रेडोबाचा ड्राय डे असतो. स्कॉचचे ब्रँड दररोज बदलत असतात. रविवार टीचर्स, सोमवारी ब्लॅक डॉग, बुधवारी 100 पायपर, गुरुवारी बेलेनटाइन, शनिवारी ब्लॅक लेबल किंवा शिवास रिगल पसंत करतो.
 
जाणून घ्या या 'सुलतान'ची खासियस...
- नरेश सांगतात, त्यांनी सुलतानला 5 वर्षांआधी रोहतकहून 2 लाख 40 हजारांत खरेदी केले होते.
- सकाळी नाश्त्यामध्ये सुलतान गावरान तूप आणि दूध घेतो.
- कैथलच्या बुढाखेडा गावातील नरेश बेनीवाल एका कृषी प्रदर्शनात या रेड्याला घेऊन आले होते.
वर्षभरात देतो वीर्याचे 30 हजार डोस...
- सुलतान वर्षभरात 30 हजार वीर्य डोस देतो. याचा एक डोस 300 रुपयांना विकतो. या हिशेबाने हा रेडा त्यांना वर्षभरात 90 लाख रुपये कमाई करून देतो.
- सुलतान 2013 मध्ये झालेल्या राष्ट्रीय पशुसौंदर्य स्पर्धेत झज्जर, करनाल आणि हिस्सारमध्ये राष्ट्रीय विजेता ठरला.
- राजस्थानच्या पुष्कर यात्रेत एका पशुप्रेमीने सुलतानची तब्बल 21 कोटींना बोली लावली होती. परंतु, नरेश म्हणाले की, सुलतान माझ्या मुलाप्रमाणे आहे, आणि मुलाची कधीच किंमत होऊ शकत नाही.
- हिसारमध्ये केंद्रीय म्हैस अनुसंधान संस्थानात पी-288 क्रमांकाचा रेडा सुलतानचा पिता होता. तो आता या जगात नाही.
- नरेश बेनीवाल यांनी सुलतानला दीड वर्षे वयाचा असतानाच या संस्थानातून आणले होते.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, शानदार सुलतान रेड्याचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...