आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मामा-भाचीचे 3 वर्षांपासून प्रेमसंबंध, नकार मिळाल्यावर उचलले हे पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पवनचे त्याच्या तरुण भाचीशी प्रेमसंबंध होते. - Divya Marathi
पवनचे त्याच्या तरुण भाचीशी प्रेमसंबंध होते.
कानपूर - यूपीच्या कानपूरमध्ये बीएसए कार्यालयात कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने फाशी घेतली. तरुणाचे त्याच्या भाचीशी प्रेमसंबंध होते, परंतु दोघांचे हे नाते कुटुंबीयांना मंजूर नव्हते. या कारणाने दररोज वाद होत होते. तरुणाने फाशी घेतल्याचे कळताच कुटुंबाने आक्रोश केला. पोलिसांनी त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे.
 
असे आहे प्रकरण...
- बर्रा परिसरातील कुंतीनगरमध्ये राहणारा राम शंकर साहू व त्यांची पत्नी कुष्मा यांना तीन मुली आहेत. तिन्ही मुलींचे लग्न झालेले आहे. दोन मुले पवन आणि पंकज सोबत राहतात.
- पवन बीएसए कार्यालयात कॉम्प्युटर ऑपरेटर पदावर कार्यरत होता. भाऊ पंकज म्हणाला, घराच्या वरच्या भागात फर्निंशिंगचे काम सुरू होते.
- गुरुवारी सकाळी पवन झोपेतून उठला आणि घरची कामे आटोपून वरती अंघोळीला चालल्याचे म्हणाला. खूप वेळ झाला तरी तो परतला नाही म्हणून वर जाऊन पाहिल्यावर त्याचा देह पंख्याला लटकलेला आढळला.
- मी ओरडल्यावर कुटुंबातील इतर सदस्यही परत आले. त्याचा मृतदेह खाली उतरवला, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता.
 
मामा-भाचीत प्रेमसंबंध
- कुटुंबाचे इतर नातेवाईक म्हणाले- पवनच्या बहिणींची लग्ने झालेली होती. आता त्याच्या वडिलांना मुलाचे हात पिवळे करायचे होते.
- आर्थिक स्थिती चांगली असलेल्या या परिवारात पवनसाठी खूप  चांगली- चांगली स्थळे येऊ लागली होती, परंतु प्रत्येक वेळी तो लग्नासाठी नकार देत होता. कारण त्याचे बहीण मोनिकाच्या जावेच्या मुलीवर 3 वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते.
- मामा-भाचीचे हे नाते वडिलांना मंजूर नव्हते. यामुळे दोन्ही कुटुंबांत कटुता आली होती.
 
काय म्हणतात पोलिस?
- बर्राचे पोलिस प्रमुख भास्कर मिश्रा म्हणाले, एका तरुणाने फाशी घेऊन आत्महत्या केली. परंतु या फाशीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...