आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्यावरील आरोप खोटे, लंडन कोर्टात प्रत्यार्पण खटल्याच्या सुनावणीपूर्वी म्हणाला माल्ल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन/नवी दिल्ली - फरार मद्य उद्योजक विजय माल्ल्या (61) च्या प्रत्यार्पणाच्या खटल्याची सुनावणी लंडनच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात सोमवारपासून सुरू झली. 14 डिसेंबरपर्यंत 8 दिवस ही सुनावणी चालेल. वेस्टमिंस्टर कोर्टात सादर होण्यापूर्वी माल्ल्याने त्याच्यावर लावलेले आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. माल्ल्याने म्हटले, माझ्यावरील आरोप बिनबुडाचे आणि खोटे आहेत. सीबीआयच्या सुत्रांच्या मते सुनावणीदरम्यान तपास संस्थेच्या अधिकाऱ्यांचे पथकही उपस्थित असेल. त्यांचे नेतृत्त्व स्पेशल सीबीआय डायरेक्टर राकेश अस्थाना करतील. या केसमध्ये ब्रिटनचे क्राऊन प्रोसिक्युशन सर्व्हीस (सीपीएस) भारतीय अधिकाऱ्यांची बाजू मांडत आहे. माल्ल्या या आधी 21 नोव्हेंबरला कोर्टात सादर झाला होता. माल्ल्यावर 17 बँकांचे 9,432 कोटींचे कर्ज आहे. अटक टाळण्यासाठी तो गेल्या वर्षी 2 मार्चला देश सोडून फरार झाला होता. भारताने ब्रिटनकडे त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. 
 
 
सुनवणीपूर्वी काय म्हणाला माल्ल्या..
- माल्ल्याने कोर्टात सादर होण्यापूर्वी त्याच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळले. तो म्हणाला, मी अनेकदा सांगितले आहे की, आरोप खोटो आणि बिनबुडाचे आहेत. मला आणखी काही म्हणायचे नाही. कोर्टात पुरावे आपोआप सादर होतील. 
- माल्ल्या पुढे म्हणाला, मी निर्णय घेणारा कोणी नाही. मी फक्त प्रक्रिया पूर्ण करणार आहे. मला बोलण्यासारखे काही नाही. 
- माल्ल्याचे वकील म्हणाले, भारतात माल्ल्यांच्या जीवाला धोका आहे. त्यानंतर प्रोसिक्युशन माल्ल्याच्या सुरक्षेबाबत माहिती देण्याच्या तयारीत आहे. 
- लंडनच्या वेस्टमिंस्टर कोर्टात या प्रकरणी 4, 5, 6, 7, 11, 12, 13 आणि 14 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. तर डिफेन्स टाइम टेबलनुसार 24 डिसेंबरला निर्णय सुनावला जाईळ. 
 
माल्ल्याला आतापर्यंत दोन वेळा अटक 
- पहिल्यांदा : लंडन अॅडमिनिस्ट्रेशनने माल्याला रेड कॉर्नर नोटिसच्या आधारे सर्वात आधी 18 एप्रिलला अटक केले होते. पण 3 तासांत त्याला जामीन मिळाला. 
- दुसऱ्यांदा : 3 ऑक्टोबरला मनी लॉन्ड्रिंगच्या दुसऱ्या केसमध्ये माल्ल्याला अटक करण्यात आली होती. त्यावेळीही त्याला अर्ध्या तासात जामीन मिळाला होता. 
- भारताने 8 फेब्रुवारीला माल्ल्याच्या प्रत्यार्पणाची विनंती केली होती. त्यानंतर मार्चमध्ये ब्रिटिश पीएम थेरेसा मे यांनी लंदनमध्ये अरुण जेटलींशी प्रोटोकॉल तोडून भेट घेतली होती. या भेटीत माल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत चर्चा झाली होती. 
- मार्चमध्येच यूकेने भारताला सांगितले होते की, त्यांची विनंती फॉरेन मिनिस्ट्रीने सर्टिफाय केली आहे. 
 
कर्ज किती.. 
- 31 जानेवारी 2014 पर्यंत किंगफिशर एअरलाइन्सवर बँकांचे 6,963 कोटींचे कर्ज होते. त्यावरील व्याजानंतर कर्जाची रक्कम 9,432 कोटी झाली आहे. सीबीआयने 1000 हून अधिक पानांच्या चार्जशीटमध्ये म्हटले की, किंगफिशर एअरलाइन्सने IDBI कडून मिळालेले 900 कोटी पैकी 254 कोटी वैयक्तिक वापरासाठी खर्च केले. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, कोणत्या बँकेचे माल्ल्यावर किती आहे कर्ज... 
बातम्या आणखी आहेत...