आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आई धायमोकलून रडत होती, सुनेने माहेरात भानगड असल्यामुळे मुलाचा केला खून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी प्रियंका. तिने वडिलांचा खून केल्याचे मुलांनी पोलिसांना सांगितले. - Divya Marathi
आरोपी प्रियंका. तिने वडिलांचा खून केल्याचे मुलांनी पोलिसांना सांगितले.
लखीसराय - बिहारच्या लखीसरायमध्ये शिक्षिका असलेल्या  पत्नीने तिच्या पतीचा चाकूने भोसकून खून केला. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. मुलाचा खून झालेला पाहून त्याची आई शारदा देवी म्हणाली की, सुनेचे माहेरात एका मुलाशी अवैध संबंध होते. ती सासर सोडून माहेरात राहणार होती. माझ्या मुलाने याचा विरोध केल्याने तिने त्याचा जीव घेतला.
 
सासरी नांदायचे नाही सुनेला...
- ही घटना लखीसराय जिल्ह्यातील कबैया परिसरातील सोमवारी रात्री घडली. 
- शारदा देवींनी मंगळवारी म्हटले की, सून दुर्गा पूजेच्या निमित्ताने आठवड्याभरापूर्वीच माहेरात गेली होती.
- दुर्गा पूजेनंतर सुजित पत्नीला आणायला सासरी गेला, परंतु सून माहेरातून येऊ इच्छित होत नाही. 
- तिच्या गावातल्या एका तरुणाशी अवैध संबंधांमुळे ती माहेरातच राहायचे म्हणत होती. माझ्या मुलाने याचा विरोध केला तेव्हा सुनेने चाकू भोसकून त्याचा खून केला.
- मृत सुजित शेखपुरा जिल्ह्यातील अबगिलचा राहणारा होता.
 
मुले म्हणाली- आईने केला पप्पांचा खून
- प्रियंकाने पतीला चाकू भोसकला तेव्हा तिची दोन्ही मुले घटनास्थळी होती.
- दोन्ही मुलांनी पोलिसांना सांगितले की, आईने पप्पांना चाकू मारला होता.
- पोलिसांनी मुलांच्या जबाबावरून प्रियंकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- पोलिस स्टेशन इंचार्ज आशुतोष कुमार म्हणाले की, चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशीही केली जात आहे.
 
मी जाणूनबुजून पतीला मारले नाही
- प्रियंका म्हणाली की, मी जाणूनबुजून पतीला चाकू मारला नाही. मी कुणालाच मारू शकत नाही. 
- मी छोट्या-छोट्या मुलांना शिकवते, चांगले शिक्षण देते. मलाही दोन मुले आहेत. मी कुणालाच मारू शकत नाही. मी खूनी नाहीये, असे म्हणून तिने टाहो फोडला होता.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, घटनेशी संबंधित आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...