आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या माघारी त्याचा मित्र यायचा घरी, प्रियकरासह पत्नीने अशी केली \'अडचण\' दूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही धक्कादायक घटना पूर्णियामध्ये घडली. - Divya Marathi
ही धक्कादायक घटना पूर्णियामध्ये घडली.
पूर्णिया - बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात एका महिलेने प्रियकरासह मिळून पतीची हत्या केली. हत्येनंतर तिने पतीचा मृतदेह बेडरूममध्ये ठेवला आणि रात्रभर त्याच्यासह झोपली. दुसऱ्या दिवशी तिने प्रियकराच्या मदतीने मृतदेहाची दाट झुडपांमध्ये विल्हेवाट लावली. पोलिसांनी शुक्रवारी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
 
नवऱ्याच्या मित्राशीच झाले प्रेम...
- महिलेचा पती छोटू मंडल वीजतंत्रीचे काम करायचा. विद्युत विभागात काम करणाऱ्या कॅशिअर कुणाल कुमार भारतीची छोटूशी मैत्री होती.
- दोघेही एकाच ठिकाणी राहायचे. कुणाला छोटूच्या घरी ये-जा करायचा. दरम्यान, छोटूच्या पत्नीचे कुणालवर प्रेम जडले.
- तिच्या नवऱ्याला जेव्हा या प्रेमप्रकरणाची भनक लागली तेव्हा तो याचा विरोध करू लागला. तिच्यावर त्याने बंधने घातली. यामुळे ललिताने नवऱ्याचा काटा काढण्याचा प्लॅन बनवला.
 
खुनानंतर स्वत: पोलिसांत जाऊन दिली पती हरवल्याची तक्रार...
- खुनानंतर दोन दिवसांनी ललिताने पोलिसांत जाऊन पती हरवल्याची तक्रार दिली.
-दरम्यान, पोलिसांना कुणीतरी सांगितले की, पतीचा मृतदेह लालबागमध्ये आढळला आहे. यानंतर पोलिस ललिताला घेऊन घटनास्थळी गेले.
 
दोघांनी केले होते लव्ह मॅरेज
- छोटूचा भाऊ राजेश कुमार मंडलने सांगितले की, छोटूने 10 वर्षांपूर्वी हिच्याशी लव्ह मॅरेज केले. आंतरजातीय असल्याने घरच्यांनी त्याच्यासाठी घराची दारे बंद केली. यानेही मग तिच्यासाठी शहरात किरायाने खोली घेतली आणि तेथे राहू लागला.
- वीज मंडळात काम करून तो घर चालवत होता. 
 
एसपींनी केला खुलासा
 - शुक्रवारी पत्रकारांना संबोधित करताना एसपी निशांत कुमार तिवारी म्हणाले की, छोटू मंडलचा मृतदेह लालबागमध्ये आढळला. त्याच्या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने मिळून त्याचा खून केला. दोघांनी मिळून घरात झोपलेल्या छोटू मंडलच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केल्याने छोटू जागीच गतप्राण झाला होता. दोन्हीही आरोपींना गुन्हा कबूल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील कारवाई सुरू आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, घटनेशी संबंधित इन्फोग्राफिक माहिती सोबत फोटोज...
बातम्या आणखी आहेत...