आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Wife Sleeps With Husband Dead Body For 6 Days National Crime Latest News And Updates

पतीच्या मृतदेहासह 6 दिवस झोपली पत्नी, लव्ह मॅरेजनंतर झाले असे हाल...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैकुंठपूर (रायपूर) - प्रेमविवाह ही काही विशेष बाब नाही, परंतु बऱ्याचदा समाजाकडून याला मान्यता देण्यात येत नसते. प्रेमविवाहाची शिक्षा म्हणून समाज किती निष्ठूर होऊ शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे ही घटना आहे.
 
असे आहे प्रकरण...
- मनेंद्रगडमधील परसगढी गावात एका मृतदेहाचे अंत्यसंस्कार तब्बल 6 दिवस लांबणीवर पडले. कारण काय, तर मृत शिवनाथने प्रेमविवाह केला होता आणि गावकऱ्यांनी त्याच्यापासून सर्व संबंध तोडले होते. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना गावात घडली. 
 
6 दिवस पतीच्या मृतदेहासोबत राहिली पत्नी...
- दुसरीकडे गावकऱ्यांचे म्हणणे होते की, आम्हाला शिवनाथच्या मृत्यूची माहिती उशिरा मिळाली. यामुळे प्रश्न असा उभा राहतो की, 5 ते 6 दिवसांपर्यंत गावातील घरात मृतदेह पडून आहे आणि गावकऱ्यांना याची साधी माहितीही कशी कळली नसेल?
- घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेतली आणि मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कारवाई केली. कारवाईला संध्याकाळ झाल्याने मंगळवारी मृतदेहाचे पोस्टमॉर्टम होऊ शकले नाही.
बुधवारी मृतदेहाचे पोस्टमॉर्टम होईल. यानंतर मृत्यूच्या कारणांचा खुलासा होऊ शकेल. मिळालेल्या माहितीनुसार, परसगढीत राहणाऱ्या 52 वर्षीय शिवनाथचा मृत्यू मागच्या 26 ऑक्टोबरला गुरुवारी घरातच झाला होता. त्याच्या मृतदेहासह त्याची पत्नी तब्बल 6 दिवस राहिली. परंतु गावकऱ्यांनी साधी विचारपूसही केली नाही.
 
पुढच्या इन्फोग्राफिकमध्ये पाहा, पूर्ण प्रकरण...
बातम्या आणखी आहेत...