आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्यांना लुटायची होती तिची कार अन् अब्रू, नवऱ्याने वाचवले तर मिळाली ही शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इलाहाबाद - प्रयागनगरीची रहिवासी रिद्धीचे जीवन एखाद्या बॉलीवूडपटापेक्षा कमी नाही. लग्नाच्या वाढदिवसाला नवऱ्यासह सिनेमा पाहायला गेली होती. मग भामट्यांनी कार लुटण्यासोबतच तिच्यावरही हात टाकण्याचा प्रयत्न केला. यानंतर जे घडले त्यामुळे रिद्धीचे जीवन नेहमीसाठीच बदलले. divyamarathi.com आपल्या क्राइम सिरीजअंतर्गत या महिलेसोबत झालेल्या अन्यायाबाबत सांगत आहेत.
 
गुन्हेगाराचा चेहरा पाहताच ओरडली होती रिद्धी...
- 7 जून 2017च्या संध्याकाळी इन्स्पेक्टर मनोज तिवारी जॉर्ज टाऊनमध्ये राहणाऱ्या रिद्धी सिंहला फोन करतात आणि लगेच पोलिस स्टेशनला यायला सांगतात. 
- रिद्धी तेथे  पोहोचते. तिथे हातकडी घातलेल्या एकाला पाहताच ती किंचाळते. इन्स्पेक्टर तिला काही म्हणतील त्या आधीच ती म्हणते, \"हाच आहे तो... यानेच माझ्या नवऱ्याला गोळी मारली होती. सर, हाच आहे तो.\"
- पोलिस लगेच ताब्यात घेतलेल्या अनुज अग्रवाल आणि त्याचा साथीदार पवन हजारी यांना लॉक-अपमध्ये टाकतात.
- रिद्धीचे जेठ नीरज सिंह सांगतात, 33 वर्षांची रिद्धी घटनेच्या दोन महिन्यांनंतरही गुमसुम, उदास आहे. तिच्या डोळ्यात सारखे अश्रू तरळत असतात. आम्ही तिला तिच्या माहेर पाठवले, पण ती त्या रात्रीची भयानक घटना विसरू शकत नाहीये. सारखी रडत असते.
- आरोपी अरुणची चौकशी केल्यावर तो म्हणाला, आम्हाला फक्त तिची कार लुटायची होती. कारमध्ये तिला पाहून आमची नियत खराब झाली. तिचा नवरा आणि कारची चाबी त्याने हिसकावली. मला राग आला अन् मी गोळी मारली.
 
पीडब्ल्यूडीमध्ये ठेकेदार होता रिद्धीचा पती
- मागच्या 1 जून रोजी इलाहाबादमध्ये ठेकेदार धीरज सिंह यांचा भररस्त्यात खून झाला होता.
- हल्लेखोरांनी त्यांची पत्नी रिद्धीलाही मारण्याचा प्रयत्न केला, पण नशिबाने ती वाचली.
- धीरजचे पाच वर्षांपूर्वी रिद्धीशी लग्न झाले होते. त्यांचे पूर्ण कुटुंब जॉर्ज टाऊनमध्ये राहते.
- आश्चर्याची गोष्ट अशी की धीरजचा खून पोलिस मुख्यालयासमोर झाला, तरीही पोलिसांना आरोपींना पकडायला खूप वेळ लागला.
 
मुख्यमंत्र्यांना केले होते आर्जव
- खुनाच्या फक्त 3 दिवसांनंतर इलाहबादमध्ये सीएम आदित्यनाथ योगी यांचा कार्यक्रम होता.
- पीडिता रिद्धीने शहराच्या महापौरांच्या मदतीने त्यांची भेट घेतली. तिने योगींना आपल्या नवऱ्याच्या खुन्यांना अटक करण्याची विनंती केली होती.
-  योगींनी तत्कालीन SSP शलभ माथूर यांना कडक शब्दांत निर्देश देऊन लवकरात लवकर घटनेचा उलगडा करण्याचे सांगितले. बरेच हात-पाय मारल्यावर कुठे पोलिसांना 7 जून रोजी गुन्हेगारांचा छडा लागला.
 
प्रकरणाचे करंट स्टेटस
इन्स्पेक्टर सुनील द्विवेदी म्हणाले, पोलिसांनी कोर्टात सविस्तर चार्जशीट दाखल केली आहे. पुढच्या प्रक्रिया कोर्टातून पूर्ण होईल. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी पुरावे आणि साक्षीदार सर्व चार्जशीटमध्ये दाखल केले आहेत. 
 
पुढच्या इन्फोग्राफिक्समध्ये पाहा, पत्नीने सांगितलेली काळीज हेलावणारी घटना...
बातम्या आणखी आहेत...