आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या माघारी शेजाऱ्याची बळजोरी, विवाहितेने कापला त्याचा प्रायव्हेट पार्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलेने शेजाऱ्यावर आरोप केला आहे. - Divya Marathi
महिलेने शेजाऱ्यावर आरोप केला आहे.
शहाजहांपूर - यूपीच्या जवळ शहाजहांपूरमध्ये एका महिलेने तिच्या शेजारी युवकाचा प्रायव्हेट पार्टच कापून टाकला. आरडाओरडा ऐकून घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांनी त्याला लगेच रुग्णालयात दाखल केले. महिलेचे म्हणणे होते की, "तरुण बळजबरी घरात शिरला होता आणि अश्लील हरकती करू लागला होता. स्वत:ला वाचवण्यासाठी मला असे करावे लागले.'' पोलिसांत याप्रकरणी दोन्ही पक्षांकडून तक्रार दाखल झाली असून तपास सुरू आहे.
 
असे आहे पूर्ण प्रकरण...
- ही घटना नवदिया ढरोढगड गावातील आहे. येथे राहणारा राम भरोसे (35) आपल्या घराची भिंत बांधत होता.
- तेवढ्यात शेजारच्या महिलेने याचा विरोध केला. महिलेचे म्हणणे होते की, तरुण तिच्या घराच्या हद्दीत येऊन बांधकाम करू लागला.
- अगोदर दोघांत शाब्दिक बाचाबाची झाली, मग काही वेळाने प्रकरणाने मारहाणीचे वळण घेतले.
- महिलेचा आरोप आहे की, माझा पती बाहेरगावी गेला होता आणि मी घरात एकटी होते. तरुण घरात बळजबरी शिरला आणि अश्लील चाळे करायला लागला. स्वत:ला वाचवण्यासाठी मी माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता, मी सरळ त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला.
- आरडाओरड ऐकून घटनास्थळी जमा झालेल्या गावकऱ्यांनी त्याला वाचवले आणि नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. उपचारांनंतर त्याला घरी परत पाठवण्यात आले.
- दुसरीकडे, तरुणाचे म्हणणे आहे की, तो आपल्या घराची भिंत बांधत होता. महिला चुकीचे आरोप करत आहे. ती महिला असल्यामुळे माझ्याशी भांडत होती. तिनेच अगोदर मारहाणीला सुरुवात केली.
 
काय म्हणतात पोलिस?
- एसओ बिरजाराम म्हणाले, गुरुवारी दोन्ही शेजाऱ्यांचे बांधकामामुळे भांडण झाले होते. शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा वाद झाला.
- मारहाणीदरम्यान तरुणाच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर इजा झाली. दोन्ही बाजूंच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. प्रकरणाचा तपास सुरू आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...