आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेने विश्वासाने दिला मोबाइल नंबर, नराधमांनी रात्रभर केला गँगरेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - अंबिकापूरहून परतणाऱ्या एका महिलेवर तिघा जणांनी सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी सलोरा येथील एका सरकारी रुग्णालयात हे कुकृत्य केले. पीडित महिलेच्या तक्रारीवरून कटघोरा पोलिसांनी आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, एकाचा शोध सुरू आहे.

मोबाइल नंबर देणे पडले महागात
- आरोपींनी महिलेला फसवून तिचा मोबाइल नंबर घेतला होता. याचाच फायदा उचलून एका आरोपीने लगातार तिच्या लोकेशनची माहिती घेतली. त्यांनी अगोदरच प्लॅनिंग केली होती. यामुळेच त्यांनी महिलेची कटघोराला परतण्याची प्रतीक्षा केली. मग बहाणा करून सरकारी रुग्णालयात गेले आणि कुकृत्य केले.
- रुग्णालय परिसरात ज्या खोलीत आरोपींनी रेप केला, त्यात एक नर्स आपल्या कुटुंबासह राहते. घटनेच्या दिवशी ती घरी नव्हती. आरोपी अजय एक्का तिचा नवरा आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अजय एक्का नवोदय शाळेत स्टोअर कीपर आहे, प्रमोद कुर्रे लिपिक आहे, तर इतर एक आरोपी शाळेतच ठेक्याने ड्रायव्हर असून गाडी चालवतो. पोलिसांनी घटनेतील स्कॉर्पिओसहित स्विफ्ट कार जप्त केली आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर इन्फोग्राफिक्समध्ये पाहा, महिलेने सांगितलेली दुर्दैवी आपबीती...
बातम्या आणखी आहेत...