महोबा - हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने एका विवाहितेला जिवंत जाळून मारण्याचे प्रकरण समोर आले आहे. मृत विवाहितेच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, तिच्या सासरचे हुंड्यासाठी एक लाख रुपये नगदी आणि एक कार मागत होते. यासाठी ते त्यांच्या मुलीला खूप दिवसांपासून टॉर्चर करत होते. बुधवारी संध्याकाळी तिला जिवंत जाळण्यात आले. यात विवाहितेचा मृत्यू झाला असून घटनेनंतर सासरचे फरार झाले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
असे आहे प्रकरण...
- मध्य प्रदेशच्या टिकमगढचे रहिवासी यासिन यांनी 4 वर्षांपूर्वी त्यांची मुलगी रेश्माचे लग्न महोबामधील आफताबशी झाले होते.
- मुलीच्या लग्नात 4 लाखांचा खर्च झाला होता. लग्नानंतर रेश्मा शिकू इच्छित होती. बीएड केल्यानंतर नोकरी करण्याची तिची इच्छा होती. परंतु सासरच्यांनी हुंड्यात 1 लाख रुपये आणि कारची मागणी करून तिचा छळ चालवला.
- तिला नेहमी मारहाण होत होती. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने पती आफताब आणि सासू-सासऱ्यांनी जास्तच छळ मांडला. तिला टॉर्चर करत होते.
- बुधवारी याची माहिती रेश्माने आपल्या आईला दिली. तिचे आईवडील यावर काही विचार करतील, तितक्यात तिच्या मृत्यूची बातमी येऊन धडकली.
मृत महिलेच्या नातेवाइकांनी लावले हे आरोप
- रेश्माच्या नातेवाइकांनी सांगितले, बुधवारी संध्याकाळी उशिरा शेजाऱ्यांनी फोनवर म्हटले की घरात अचानक आग लागली आणि रेश्माचा मृत्यू झाला. सासऱ्यांनी याची साधी माहितीही कळवली नाही.
- रेश्माची आई सायराबानो म्हणाल्या, मला 4 मुली आहेत. मग कुठून यांची हुंड्याची मागणी पूर्ण करणार? सासरच्यांनी हुंड्यासाठी त्यांच्या मुलीला जिवंत जाळून मारले.
काय म्हणतात पोलिस अधिकारी?
-एसपी अनिस अहमद अन्सारी म्हणाले, मृत विवाहितेच्या नातेवाइकांनी रेश्माचा पती आणि सासू-सासऱ्यांविरुद्ध लिखित तक्रार दिली आहे. केस दाखल करण्यात आली असून घटनेनंतर सासरचे सर्व फरार झाले आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींना लवकरच अटक केली जाईल.
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, या हृदयद्रावक घटनेचे आणखी फोटोज...