आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई असावी तर अशी: लोकांची धुणीभांडी करून, भाजी विकून मुलीला बनवले डॉक्टर!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजी विक्रेत्या महिलेने मुलीला डॉक्टर बनवून समाजासमोर आदर्श ठेवला. - Divya Marathi
भाजी विक्रेत्या महिलेने मुलीला डॉक्टर बनवून समाजासमोर आदर्श ठेवला.
हमीरपूर - येथे भाजी विकणाऱ्या एका महिलेने आपल्या मुलीला डॉक्टर बनवून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. महिलेचा मुलगाही बहिणीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजीचा गाडा लावतो. आता हे मायलेक पूर्ण शहरात रोल मॉडेल बनले आहेत.
 
लोकांची धुणीभांडी करून आईने पूर्ण केले मुलीचे स्वप्न
- हमीरपूरच्या मौदहा परिसरात सुमित्रा आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांना 2 मुले आणि 3 मुली आहेत. 12 वर्षांपूर्वी त्यांचे पती संतोष यांचे निधन झाले होते. यानंतर 5 ही मुलांची जबाबदारी सुमित्रा यांच्या खांद्यावर आली.
- त्या म्हणाल्या- सर्वात मोठी मुलगी अनिता शिक्षणात हुशार होती, तिला डॉक्टर बनायचे होते. मी शिकलेली नाहीये, पण मुलीची चिकाटी पाहून तिला पुढे शिकवण्याचा निर्णय घेतला. शाळेत- कॉलेजात मुलीने प्रथम क्रमांक पटकावला. यानंतर तिला कानपूरला मेडिकल एंट्रान्सच्या तयारीसाठी पाठवले.
- एक वर्षभर अभ्यास करून तिने एंट्रन्स पास केली. तिला 682वी रँक मिळाली होती. यामुळे सैफई मेडिकल कॉलेजमध्ये तिचे अॅडमिशन झाले. MBBSच्या शिक्षणाला 4 वर्षे झाली आहेत, पुढच्या वर्षी ती पूर्णपणे डॉक्टर बनणार आहे. दरम्यान, आताच तिची प्रॅक्टिसही सुरू झाली आहे.
- अनिता म्हणाली की, माझे सिलेक्शन झाले तेव्हा आई रात्रभर रडली. ते आनंदाचे अश्रू होते. आई-भावांनी माझ्यासाठी मोठा त्याग केला. आईने लोकांची धुणीभांडी करून, बसस्टँडवर पाणी विकून मला शिकवले. खर्च भागवण्यासाठी आईने नंतर भाजी विकणे सुरू केले. हे पाहून भावानेही आईला हातभार लावला. पै न् पै जोडून घरच्यांनी आधी कोचिंग, मग कॉलेजमध्ये फीस जमा केली.
- शिक्षणादरम्यान अडचण आल्याने मीही शाळेबाहेर चिंचा विकल्या. त्याच्या साहाय्याने पुस्तके विकत घेतली.
 
यासाठी झाली डॉक्टर
- सुमित्रा म्हणाल्या- मुलीसाठी कुटुंब अनेकदा उपाशी राहिले. तिच्या शिक्षणादरम्यान एक-एक रुपया जोडून पाठवला.
- मोठी मुलगी डॉक्टर बनली आहे, आता छोटी मुलगी विनीताही डॉक्टर बनू इच्छिते. तिलाही आता मेडिकल एंट्रन्सच्या तयारीसाठी कानपूरला पाठवण्यात आले आहे. अनिता म्हणाली की, गरिबी काय असते, हे माझ्यापेक्षा इतर कुणी सांगू शकणार नाही.
- वडिलांचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता, आमच्याकडे एवढे पैसे नव्हते की त्यांचा इलाज करावा, तेव्हापासूनच माझ्या मनात डॉक्टर बनण्याची इच्छा होती. म्हणूनच केवळ पैसे नाहीत म्हणून ज्यांना दवाखान्यात जाता येत नाही, अशा रुग्णांना मी मोफत तपासणार आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या आदर्श आई आणि कुटुंबाचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...