आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही महिला आहे बलात्कारी बाबाच्या कैदेत, 3 वर्षांपासून पती करतोय सुटकेची याचना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
3 वर्षांपासून गायब असलेली गुड्डी देवी व राम रहीम. - Divya Marathi
3 वर्षांपासून गायब असलेली गुड्डी देवी व राम रहीम.
जयपूर - साध्वी बलात्कार प्रकरणातील दोषी राम रहीमवर जयपूरमध्ये आणखी एका प्रकरणावर सुनावणी आहे. वास्तविक, गुरमितवर एका व्यक्तीच्या पत्नीला गायब करण्याचा आरोप आहे. राम रहीमविरुद्ध हे प्रकरण जयपूरमध्ये 5 जुलै 2015 रोजी कमलेश नावाच्या एका व्यक्तीने कोर्टात दाखल केले होते. 
 
असे आहे प्रकरण
सिरसा येथील डेरा सच्चा सौदामधून 3 वर्षांपूर्वी अचानक गायब झालेल्या महिलेचे प्रकरण समोर आले आहे. महिलेच्या पतीने डेराप्रमुख राम रहीम, मॅनेजिंग डायरेक्टर आणि सेवेदारांविरुद्ध अपहरणाचा आरोप केला आहे. पतीच्या म्हणण्यानुसार, तो त्याच्या पत्नीसह सिरसा येथे ध्यान करण्यासाठी गेला होता, परंतु स्वप्नातही असे वाटले नव्हते की या ध्यानाची किंमत अशी चुकवावी लागेल.
 
बाबाचा सेवेकरी येऊन म्हणाला, \"गुड्डीला पाठवा, तिला राम रहीम यांना भेटायचे आहे...\"
- जयपूरच्या मनोहरपुराचे रहिवासी कमलेश कुमार यांच्या म्हणण्यानुसार, ते पत्नी गुड्डी अन् दोन मुलांसह मार्च 2015 मध्ये सिरसाच्या डेरा सच्चा आश्रमात सत्संगासाठी गेले होते.
- गुड्डी तिथे महिलांच्या ग्रुपमध्ये बसली होती, तर ते स्वत: पुरुषांच्या ग्रुपमध्ये बसलेले होते. यादरम्यान एक सेवादार आला आणि म्हणाला की, गुड्डीला राम रहीम दत्ताजी भेटणार आहेत, तिला पाठवून द्या. कमलेशने यावर एका सेवादारासोबत गुड्डीला पाठवले. यानंतर गुड्डी परत आलीच नाही.
- कमलेशने तिथे सेवादारांकडे चौकशी केली तर ते म्हणाले की, गुड्डी भक्तीमध्ये लीन आहे, दोन-तीन दिवस वाट पाहा. तीन दिवसांनीही जेव्हा ती परत आली नाही तेव्हा कमलेशने तिचा डेऱ्यामध्ये शोध घेतला, पण कोणताही सुगावा हाती लागला नाही.
- यानंतर तो तडक सिरसा पोलिसांत आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवायला गेला, पण पोलिसांनी त्याला दमदाटी करून पिटाळून लावले.
- मे 2015 मध्ये कमलेशने जयपूरच्या जवाहर सर्कल पोलिसांत राम रहीमसह इतरांविरोधात गुड्डीच्या अपहरणाची तक्रार दिली. पोलिसांनी तपास न करताच 2016 एफआयआर दाखल केली.
- कमलेश यांचे वकील बाबूलाल बैरवा म्हणाले की, एफआयआरच्या विरोधात कोर्टात प्रोटेस्ट केला आहे. गुड्डीला शोधण्याऐवजी पोलिसांनी प्रकरणातच एफआयआर लावून फाइल बंद केली. डेऱ्यामध्ये ध्यानासाठी गेलेल्या गुड्डीचा आजपर्यंत शोध लागलेला नाही.
 
मुले अजूनही पाहताहेत आईची वाट
- कमलेश म्हणाले की, त्यांची दोन मुले हंसराज आणि लेखराज आजही आपल्या आईची वाट पाहतात. जगतपुरा परिसरात ते स्वत: मजुरी करून पोटापाण्यापुरते कमावतात, तर मुले गावातच राहतात.
- पीडित कमलेश म्हणाले, जवाहर सर्कल पोलिस मला घेऊन सिरसाला गेले होते, परंतु तपास न करताच परत आले. टीआय राजेश सोनी म्हणाले की, हे प्रकरण 2015चे आहे. त्या वेळी तत्कालीन तपास अधिकाऱ्यानेच एफआयआर लावली आहे. त्यांच्या तपासात काय समोर आले होते, याची मला माहिती नाही.

पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, घटनेशी संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...