आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पती म्हणाला, मला बांधून त्यांनी बायकोला शेतात नेले, तिचे किंचाळणेच ऐकू येत होते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुझफ्फरनगर- येथील भोपा परिसरात शुक्रवारी नराधमांनी बंदुकीच्या धाकावर एक महिलेवर गँगरेप केला. महिला तिचा पती आणि तान्ह्या बाळासह घरी परतत होती. तेवढ्यात वाटेत 4 नराधमांनी त्यांनी अडवले आणि दुष्कृत्य केले. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पीडितेचे मेडिकल केले आहे.
 
शेतात नेले बदमाशांनी, नवऱ्याला दोरीने आवळले...
- हे कुटुंब मुझफ्फरनगर जिल्ह्याच्या झासरी गावाचे राहणारे आहे. पीडितेच्या पतीने सांगितले की, पत्नीची तब्येत ठीक नव्हती. शुक्रवारी सकाळी तिला घेऊन जिल्हा रुग्णालयात गेलो होतो. सोबत लहान मुलगाही होता. परतताना सकाळी 11 वाजता निरगाजनी गावाजवळ एका कारमध्ये स्वार 4 जणांनी आम्हाला अडवले.
- मोटारसायकल थांबवताच चौघांनी माझ्या आणि माझ्या पत्नीवर पिस्तूल रोखले. माझ्या बाळाला हिसकावून घेतले. ते आम्हाला जवळच्या उसाच्या शेतात घेऊन गेले आणि माझे हातपाय दोरीने बांधले. मुलाच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि धमकावून पत्नीला दुसऱ्या शेतात घेऊन गेले.
- तिथे नराधमांनी तिच्यावर गँगरेप केला, मला फक्त पत्नीचे ओरडणे ऐकू येत होते. घटना घडल्यावर बदमाशांनी तोंड न उघडण्याची धमकी दिली आणि फरार झाले.
ते गेल्यानंतर माझे ओरडणे ऐकून आसपासचे लोक धावत आले आणि आमची मदत केली.
 
काय म्हणतात पोलिस?
- एसपी (ग्रामीण) अजय सहदेव म्हणाले- गुन्हा दाखल केला आहे. 4 गुन्हेगार होते, यातील दोघांनी मास्क घातलेला होता. आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. लवकरच त्यांना पकडू.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, प्रकरणाशी निगडित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...