आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासूनेच जवान सुनेला दिले नराधमांच्या ताब्यात, सामूहिक बलात्काराचा व्हिडिओही केला शूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनिपत - दिल्लीला लागून असलेल्या हरियाणाच्या सोनिपतमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. आईचा दर्जा असणाऱ्या सासूने सुनेवर आपल्या घरातच गँगरेप करायला लावला. याआधी तिने बलात्काऱ्यांशी सुनेचा सौदा केला होता. सोनिपतमधील एका गावात तरुणीने आपल्या सासूवरच आरोप केले आहेत.
> सुनेचा आरोप आहे की, तिच्या सासूने राई गावातील दोन तरुणांना तिला 15 हजारांत विकून एका खोलीत बंद केले. येथे दोघांनी तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओही बनवला.
> तरुणीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. पीडित तरुणीचे लग्न पानिपतच्या सुताना गावात झाले होते. तरुणी म्हणाली की, लग्नानंतर ऑगस्ट महिन्यात तिच्या सासूने तिला राजस्थान न्यायचे आहे म्हणून सोनिपतला आणून बसवले.
> आरोपी सरकारी कर्मचारी असून पानिपतचा रहिवासी आहे. दलबीर रंगा असे त्याचे नाव आहे. बलात्कारामध्ये त्याचा एक साथीदारही सोबत होता. दोघांनी पीडितेच्या सासूला 15 हजार रुपये देऊन सौदा केला होता. नंतर खोलीत बंद करून तिच्यावर बलात्कार केला.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित घटनेची इन्फोग्राफिक माहिती....
बातम्या आणखी आहेत...