आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Women Sold Her Sister For Thousand Then 3 Men Raped Young Girl And Brutal Killed Her

बहिणीचा नराधमांशी 1 हजारात सौदा, ती मोठ्याने ओरडल्याने त्यांनी असे केले गप्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत तरुणीच्या बहिणीने तिला केवळ 1 हजारांसाठी नराधमांना विकले. - Divya Marathi
मृत तरुणीच्या बहिणीने तिला केवळ 1 हजारांसाठी नराधमांना विकले.
मधुबनी - 1000 रुपयांसाठी एका तरुणीने आपल्या मामेबहिणीचा सौदा केला. गावातल्या वासनांध तरुणांनी संतोषीला नवी तरुणी आणल्यास हजार रुपये देण्याचे आमिष दाखवले होते. ठरलेल्या सौद्यानुसार ती आपल्या मामे बहिणीला गावातल्या 3 तरुणांकडे घेऊन गेली. यानंतर तरुणांनी तिच्यावर बलात्कारासाठी तिचे तोंड दाबले. कारण तरुणी जिवाच्या आकांताने ओरडत होती. 
 
असे आहे पूर्ण प्रकरण...
- ही घटना बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील सुग्गा पट्टी गावातील आहे. 12 सप्टेंबरला एका तरुणीचा मृतदेह आढळला होता.
- शुक्रवारी मधुबनीचे एसपी दीपक बरनवाल यांनी पत्रपरिषद घेऊन या खुनाचा उलगडा केला.
- एसपी म्हणाले की, मृत तरुणीची गावातीलच मामे बहीण संतोषीला अटक करण्यात आली आहे. तर तिच्यावर अत्याचार करणाऱ्या 3 मुलांचा शोध सुरू असून ते फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पथके पाठवली आहेत.

गावातल्या अनेकांशी संतोषीचे लैंगिक संबंध
- फुलपरास पोलिसांनी सांगितले की, मृत तरुणी आपल्या कुटुंबीयांसह गावातील जत्रा पाहायला गेली होती, तेथून ती गायब झाली. 
- मुलगी हरवल्याने वडिलांनी पोलिसांत तक्रार नोंदवली होती.
- तपासादरम्यान 12 सप्टेंबरला सकाळी एका विहिरीपाशी तरुणीचा मृतदेह आढळला. 
- याप्रकरणी अधिक तपास केल्यावर कळले की मृत मुलीची मामेबहीण संतोषी उडवाउडवीची उत्तरे देत आहे. तिची अधिक माहिती काढली असता कळले की, तिचे गावातील अनेकांशी अवैध संबंध आहेत.
- गावातीलच कुमोद यादव, रवींद्र महतो आणि रौशन यादव यांनी संतोषीला नवीन तरुणी आणून दिल्यास 1000 रुपये देण्याचे आमिष दिले होते. यानंतर तिने स्वत:च्याच मामेबहिणीला नराधमांच्या हवाली केले.
 
हे होते खुनाचे कारण
- संतोषीच्या समोरच तिन्ही तरुणांनी तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. ती जिवाच्या आकांताने ओरडू लागल्याने या तिन्ही आरोपींनी तिचा खून केला.
- कुमोदने तिचे तोंड दाबले, रवींद्रने गळा दाबला आणि रौशन यादवने मागून तिचा हात पकडला होता. अशा रीतीने तिघांनी मिळून तिचा खून केला आणि मृतदेह विहिरीजवळ फेकून दिला.
- मृतदेह आढळल्यानंतर लवकर कारवाई न झाल्याने पोलिसांवर नाराज होऊन लोकांनी रस्त्यावर चक्काजाम केले होते.
 
पुढच्या स्लाइड्सवर वाचा, घटनेशी संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...