आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आईची मदत करायची 19 वर्षीय मावशी, भाच्याने मित्रांसह खोलीत कोंडून केला सामूहिक बलात्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्या - येथील जानकी महल ट्रस्टच्या गोशाळेत एका तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. गोशाळेत काम करणारा आणि पीडित तरुणीचा भाचा यांनी एका साथीदारासह हे दुष्कृत्य केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोन आरोपींना अटकही केली आहे. तर एक जण फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पीडित तरुणी धर्मशाळेत स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिलेची लहान बहीण आहे.

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
- जानकी महाल ट्रस्टच्या धर्मशाळेत अयोध्येत येणारे थांबतात. येथेच एक मोठी गोशाळाही आहे. याची देखभाल करण्यासाठी धर्मशाळेने 52 वर्षीय लल्लन यादवला नियुक्त केले होते.
- याच धर्मशाळेत एक विधवा महिला स्वच्छतेचे काम करायला येते. तिला गावातून आणण्यासाठी आणि परत नेण्यासाठी तिची छोटी बहीण मालती (19, काल्पनिक नाव) येते. कधी-कधी मोठी बहीण कामावर न आल्याने ती स्वत:च साफसफाई करायला येते.
- परंतु, सोमवारी ती साफसफाई करायला आली तेव्हा गोशाळेत असलेल्या एका खोलीत मोबाइल चार्ज करण्यासाठी गेली होती. त्या वेळी लल्लन यादव, तिचा भाचा श्याम आणि भाच्याचा मित्र आशिषने तिला पकडून खोलीत बंद केले आणि गँगरेप केला.

 

काय म्हणतात पोलिस?
- सीओ अयोध्या राजू कुमार साव म्हणाले, सोमवारी संध्याकाळी 4 वाजता 100 नंबरवर माहिती मिळाली की, जानकी महल ट्रस्टमध्ये एका महिलेवर रेप झाला आहे.
- माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. येथे कळले की त्योरा माझी येथे राहणारी एक महिला 3 महिन्यांपासून येथे काम करते. तिची छोटी बहीण मालती (कालनिक नाव) तिला सोडायला व न्यायला नेहमी जायची.
- गोशाळेची देखभाल करणाऱ्या लल्लनने येथे एक खोली घेतलेली होती. तिचा भाचा श्याम येथे भेटायला यायचा.
- तरुणीचा आरोप आहे की, मोबाइलची बॅटरी संपल्याने ती लल्लनच्या खोलीत चार्ज करण्यासाठी गेली होती. त्याच वेळी लल्लन यादव, तिचा भाचा श्याम सिंह आणि आशिष पांडेय यांनी दार बंद करून गँगरेप केला.
- पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. तिसऱ्या आरोपीला लवकरच अटक केली जाईल.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इन्फोग्राफिकमध्ये संपूर्ण घटनाक्रम...

बातम्या आणखी आहेत...