आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरुणी गेली किराया द्यायला, मालकाने कोल्ड ड्रिंक पाजून बेशुद्ध करून रात्रभर केला रेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फरिदाबाद - सेक्टर 17 मध्ये एकांत रेस्टॉरेंटच्या जवळ गोल्डन स्पामध्ये काम करणाऱ्या 21 वर्षीय तरुणीवर दुकान मालकाने शुक्रवारी संध्याकाळी कोल्ड ड्रिंकमध्ये अमली पदार्थ पाजून बलात्कार केला. नशेच्या अवस्थेत तरुणीला रात्रभर खोलीतच ठेवले. सकाळी शुद्धीत आल्यावर तरुणीने पोलिसांत याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवर आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनुसार, पीडिता स्पा मालकाच्या म्हणण्यावरून आरोपीच्या घरी किराया द्यायला गेली होती.
बेशुद्ध असताना तरुणीवर आरोपीन रात्रभर अनेक वेळा बलात्कार केला. तरुणीला सकाळी शुद्ध आली तेव्हा तिने सरळ पोलिस स्टेशन गाठून याची तक्रार दिली. याआधारे पोलिसांनी समीरवर गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटकही करण्यात आली आहे. तरुणीला आरोपीपर्यंत नेण्यामध्ये आणखी कुणाचा हात आहे की, याचा पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणी पीडितेची पार्श्वभूमीही तपासली जात आहे. पीडिता काम करत असलेला गोल्डन स्पा एका महिन्यापूर्वीच उघडला होता. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
 
पुढच्या इन्फोग्राफिकमधून वाचा, दुर्दैवी घटनाक्रम...
बातम्या आणखी आहेत...