आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SPG संरक्षण प्रियंका गांधी यांना आहे जमिनीला नाही, माहिती आयोगाची भूमीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिमला (हिमाचल प्रदेश)- कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या सिमल्यातील जमीनीची माहिती आरटीआय अंतर्गत मागविण्यात आली होती. येत्या 10 दिवसांत ही माहिती देण्याचा आदेश हिमाचलच्या राज्य माहिती आयोगाने माहिती अधिकाऱ्यांना दिला आहे. प्रियंका गांधी यांच्या घराची माहिती दिल्याने संरक्षणात काही बाधा येणार नाही. एसपीजी संरक्षण त्यांना स्वतःला देण्यात आले आहे. जमिनीला नाही, अशी भूमीका या आयोगाने घेतली आहे. सिमल्यातील छराबडा परिसरात प्रियंका गांधी यांचे समर हाऊस बांधले जात आहे. या जमिनीची पॉवर ऑफ अॅटर्नी एका स्थानिक नागरिकाकडे आहे.
माहिती आयोग म्हणाला, प्रियंका नेत्या आहेत
यावेळी माहिती आयुक्त के. डी. बातिश आणि भीमसेन यांनी सांगितले, की निवडणूक लढण्यापूर्वी राजकीय नेत्यांना आपल्या संपत्तीची माहिती सार्वजनिक करावी लागते. त्यामुळे आरटीआय अंतर्गत अर्जदाराला माहिती देणे अनिवार्य आहे. प्रियंका गांधी यांनी आतापर्यंत निवडणूक लढविलेली नाही. पण कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासाठी त्यांनी प्रचार केला आहे. त्यामुळे त्या नेत्या आहेत.
23 जुलैला दंडावर होईल निर्णय
प्रियंका गांधी यांच्या जमिनीची माहिती मिळण्यासाठी गेल्या वर्षी अर्जदाराने अर्ज दाखल केला होता. पण तेव्हापासून माहिती देण्यात आली नाही. अशा वेळी माहिती देण्यास विलंब केल्याने माहिती अधिकाऱ्यांवर दंड आकारण्याची तरतुद आहे. यावर येत्या 23 जुलै रोजी निर्णय घेतला जाणार आहे.
असे आहे प्रकरण
देवाशीष भट्टाचार्य यांनी गेल्या वर्षी प्रियंका गांधी यांच्या जमिनीची नोंदणी, फाइल नोटिंग, बांधकामाचे स्टेट्स आदी विषयांवर माहिती मागितली होती. सिमल्याच्या एडीएम यांनी या अर्जातील एका भागाला रद्द केले होते. सुरक्षेच्या कारणामुळे याची माहिती देता येणार नाही, असे यावेळी सांगण्यात आले होते. तेव्हा याची खुप उलट सुलट चर्चा झाली होती.