आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्फोसिस शेअरधारकांना परत करणार 13,000 कोटी; मार्च तिमाहीत केवळ 0.2 टक्के नफा वाढला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- इन्फोसिसचे तिमाही निकाल कंपनीचे सीईओ विशाल सिक्का यांनी जारी केले. या निकालावर कंपनीच्या संस्थापकांचा दबाव स्पष्ट दिसून आला. कंपनीच्या संस्थापकांनी मोठ्या प्रमाणात नगदी पैसे ठेवणे तसेच अध्यक्ष आर. शेषासायी यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 

कंपनीच्या संचालक मंडळाने लाभांश आणि शेअर बायबॅकच्या स्वरूपात शेअरधारकांना १३,००० कोटी रुपये परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर रवी वेंकटेशन यांना उपाध्यक्ष बनवण्याचीही घोषणा केली आहे. ते सध्या कंपनीचे स्वतंत्र संचालक तसेच बँक ऑफ बडोद्याचे अध्यक्ष आहेत. असे असले तरी कंपनीची तिमाही आकडेवारी नकारात्मक आली आहे. मार्च तिमाहीमध्ये महसूल ३.४ टक्के आणि नफा केवळ ०.२ टक्क्यांनी वाढला आहे. डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत नफा २.८ टक्के आणि महसूल ०.९ टक्क्यांनी कमी झाला आहे. कंपनीसमोर अचानक आलेली अाव्हाने तसेच इतर सदम्यांमुळे कंपनीच्या निकालावर परिणाम झाला असल्याचे सिक्का यांनी सांगितले. मार्च तिमाही सर्वसामान्यपणे कमजोरच मानली जाते.  

कंपनीने २०१६-१७ साठी २७५ टक्के अंतिम लाभांशाचीही घोषणा केली. पाच रुपये दर्शनमूल्य असणाऱ्या शेअरवर १४.७५ रुपये लाभांश मिळेल. याआधी १४ ऑक्टोबर २०१६ रोजी एप्रिल ते सप्टेंबर सहामाहीसाठी प्रती शेअर ११ रुपये लाभांश देण्याची घोषणा केली होती. याचप्रमाणे २०१६-१७ साठी एकूण लाभांश २५.७५ रुपये असेल. अंतिम लाभांशाच्या स्वरूपात कंपनी ४,०७८ कोटी रुपये देईल. पूर्ण वर्षाचा लाभांश ७,११९ कोटी रुपये असेल. ही रक्कम वार्षिक नफ्याच्या ४९.५ टक्के आहे. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...