आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Employees Levels Sexual Harassment Charge Against Seneor Executive In Infosys Company

INFOSYSच्या महिला कर्मचार्‍यांनी वरिष्ठ अधिकार्‍यावर केले लैंगिक शोषणाचे आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु- देशातील दूसरी सगळ्यात मोठी आयटी कंपनी 'इंफोसिस'मध्ये काम करणार्‍या महिला कर्मचार्‍यांनी एका वरिष्ठ अधिकार्‍यावर लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले आहेत. पीडित महिलांनी एका अज्ञात ईमेल आयडीवरून व्यवस्थापनाकडे संबंधित अधिकार्‍याविरुद्ध तक्रार केली आहे.
महिला कर्मचार्‍यांच्या तक्रारीवर कंपनीचे प्रवक्ता म्हणाले, लैंगिक शोषणाच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली जाते. तसेच प्रकरणाची सखोल चौकशीही केली जाते. नंतर दोषी कर्मचार्‍यावर कठोर कारवाई केली जाते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिला कर्मचारी लैंगिक शोषणप्रकरणी च के लिए कंपनीने एक चौकशी समिती तयार केली आहे. दोषी अधिकार्‍यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.

कंपनीतील पीडित महिलांना न्याय मिळावा, यासाठी एका स्थानिक वृत्तपत्रालाही ईमेल पाठवण्यात आला आहे. वृत्तपत्र कार्यालयाला infywomen@outlook.com या ईमेल आयडीवरून तक्रारीचा मेल मिळाला आहे. इमेल सोबत 'Infy women employees' अशी स्वाक्षरीही करण्यात आली आहे.