आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीला म्हणाले होते, घरी येऊ शकणार नाही, खरे ठरले शहीदाचे अखेरचे शब्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरी येणार होता, मात्र आता सीमेवर तणावाची परिस्थिती आहे, फायरिंग सुरु आहे. त्यामुळे मी येऊ शकत नाही. - Divya Marathi
घरी येणार होता, मात्र आता सीमेवर तणावाची परिस्थिती आहे, फायरिंग सुरु आहे. त्यामुळे मी येऊ शकत नाही.
जम्मू - पाकिस्तानी रेंजर्सच्या फायरिंगमध्ये जखमी बीएसएफचे कॉन्स्टेबल गुरनामसिंग शहीद झाले आहेत. त्यांनी सहकारी जवानांच्या साथीने पाकिस्तानी घुसखोरी हाणून पाडली होती. २१ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी रेंजर्ससोबतच्या चकमकीत जखमी झाल्यानंतर गुरनाम यांना जम्मू गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या डोक्यात गोळी लागली होती. रविवारी त्यांचे वडील कुलबीरसिंग म्हणाले, मोदी सरकारकडे मागणी आहे की आम्हाला युद्ध पाहिजे.
घरी येऊ शकणार नाही, खरे ठरले शहीदाचे अखेरचे शब्द
- बीएसएफ जवान गुरनामसिंग यांनी जीवन आणि मरणाच्या युद्धात अखेर हार मानली आहे. पाकिस्तानी रेंजर्सच्या फायरिंगमध्ये गंभीर जखमी बीएसएफचे कॉन्स्टेबल गुरनाम शहीद झाले आहेत.
- गुरनाम दररोज घरच्यांसोबत बोलत होते. १९ ऑक्टोबरच्या रात्री पाकिस्तानी रेंजर्ससोबतच्या चकमकीनंतरही ते कुटुंबीयांसोबत बोलले होते. हे त्यांचे कुटुंबीयांसोबतचे अखेरचे बोलणे ठरले.
- गुरनाम म्हणाले होते, मी घरी येणार होता, मात्र आता सीमेवर तणावाची परिस्थिती आहे, फायरिंग सुरु आहे. त्यामुळे मी येऊ शकत नाही.
साध्या कुटुंबातील होते गुरनाम..
- २४ वर्षांचे गुरनामसिंग हे अतिशय साध्या कुटुंबातील होते. जम्मूमधील आरएस पूरा येथे त्यांची नियुक्ती होती. वडील स्कूल बस ड्रायव्हर आहेत.
- शनिवारी उशिरा रात्री त्यांच्या शहादतनंतर जम्मूमध्ये बीएसएफचे आयजी डी.के.उपाध्याय म्हणाले, त्यांनी बहादुरीने शत्रुंशी सामना केला. आम्ही आमचा एक शूर गमावला आहे.
- गुरनाम हे रेजिमेंट १७३ बीएसएफ (ई कंपनी)मध्ये तैनात होते. त्यांच्या डोक्यात गोळी लागली होती. गुरनाम यांच्यावर जम्मूमध्ये उपचार सुरु होते.

कशी लागली होती गोळी
- १९ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर जम्मूमधील हीरानगर सेक्टरयेथील बोबिया पोस्टवर गुरनामसिंग तैनात होते. रात्री त्यांना सीमेवर काही हलचाल लक्षात आली.
- साधारण १५० मीटर अंतरावर त्यांना अस्पष्ट चेहरे दिसले. त्यांनी थोडाही विलंब न लावता सहकाऱ्यांना अलर्ट केले आणि पुढच्याच क्षणी लक्षात आले की ते दहशतवादी आहेत.
- त्यानंतर दोन्ही बाजूंनी फायरिंग सुरु झाली. बीएसएफ जवानांच्या माऱ्यापुढे दहशतवादी टिकू शकले नाही आणि ते माघारी फिरले.
- रिपोर्ट्सनुसार, २१ ऑक्टोबरच्या सकाळी पाकिस्तानी रेंजर्सने स्नायपर रायफल्समधून गुरनामसिंग यांना लक्ष्य केले. डोक्यात गोली लागल्याने ते जमखी झाले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, रेजिमेंट १७३ बीएसएफ (ई कंपनी)चे गुरनाम यांचे फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...