आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Injured In BJP Protest Police Horse Shaktiman Dies

37 दिवसानंतर \'शक्तिमान\'ने प्राण सोडले, भाजप आमदार म्‍हणाले - माझा पाय कापा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेहराडून- उत्तराखंड पोलिसांचा घोडा शक्‍तीमान याने 37 दिवसानंतर बुधवारी प्राण सोडले. 14 मार्चला भाजपाच्‍या आंदोलनात हा घोडा जखमी झाला होता. त्‍यानंतर त्‍याचा एक पाय कापावा लागला. तेव्‍हापासून तो पूर्णपणे बरा होत नव्‍हता. या प्रकरणातील आरोपी भाजप आमदार गणेश जोशी म्‍हणाले, ''या प्रकरणात माझी काही चूक नाही. माझा गुन्‍हा सिद्ध झाला तर माझा पाय कापा.''
> उत्तराखंड भाजपचे अध्‍यक्ष अजय भट्ट म्‍हणाले, 'शक्तिमानच्‍या मृत्‍यूत कॉंग्रेस सरकार
जबाबदार आहे.'
> ' जाणीवपूर्वक घोड्यावर योग्‍य उपचार केले नाहीत. त्‍यामुळेच या घोड्याचा पाय
कापावा लागला व त्‍याचा मृत्‍यू झाला.'
> माजी मुख्‍यमंत्री हरीश रावत म्‍हणाले- 'शक्तिमान गेल्‍याची बातमी ऐकून मला धक्‍का
बसला. मी शब्दांमध्‍ये भावना व्‍यक्‍त करू शकत नाही. मला वाटत होते की तो लवकर
बरा होईल.'
> शक्तिमानवर उपचार करणा-या डॉक्‍टरांनी सांगितले की, ''मी खूप दु:खी आहे. आम्‍ही
सर्वांनी त्‍याला वाचवण्‍याचा पूर्ण प्रयत्‍न केला.''
काय आहे प्रकरण..
> भाजपने भ्रष्टाचार व कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात विधानसभेवर मोर्चा काढला होता.
> 14 मार्च रोजी निघालेल्‍या या मोर्च्याला उत्तराखंड पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला.
> गर्दी नियंत्रित करण्‍यासाठी काही पोलिस घोड्यावर आले होते.
> घोड्याने भाजप नेत्‍याला लाथ मारली होती, अशी माहिती आहे.
> डेहराडूनचे पोलिस अधिक्षक सदानंद दाते म्‍हणाले - व्हिडिओमध्ये आमदार गणेश जोशी लाठीच्या सहाय्याने घोड्याला मारताना दिसत आहेत.
> या घटनेनंतर आमदार जोशी आणि इतरांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
पुढे पाहा, घटनेशी संबंधित फोटो.. अखेरच्‍या स्‍लाइडवर व्‍हिडिओ....