आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाकीवर डाग? CISF जवानाने पत्नी आणि 8 महिन्यांच्या चिमुरडीसोबत केले हे कृत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिमुरडी आणि जवान संजयकुमारचे फासावर लटकलेले मृतदेह - Divya Marathi
चिमुरडी आणि जवान संजयकुमारचे फासावर लटकलेले मृतदेह
बिलासपूर- छत्तीसगडमधील कोरबा येथे एका CISF जवानाने पत्नी आणि 8 महिन्यांच्या चिमुरडीची निर्घुण हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संजयकुमार मंडल असे जवानाचे नाव होते.

या सामूहीक हत्याकांडानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, संजयकुमार मंडल याची विभागीय चौकशी सुरु होती. त्याच्यावर कथित आरोप आहे. त्यामुळे मंडल यांना नैराश्य आले होते. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंब देखील प्रचंड तणावात वावरत होते. पण, या प्रकरणीत मंडळ यांना लवकरच क्लीन चिट मिळणार होती, असे CISF च्या अधिकार्‍यांनी खुलासा केला आहे.

आधी विष पाजले, नंतर फासावर लटकवले...
- संजयकुमार मंडल, पत्नी रिंकी आणि चिमुरडी या तिघांचे मृतदेह CISFच्या कॉलनीतील एका क्वॉर्टरमध्ये राहात होते. याच घरात तिघांचे मृतदेह आढळून आले आहे.
- घरात एक विषाची बाटली सापडली आहे. त्यामुळे संजयकुमार यांनी पत्नी आणि मुलीला आधी विष पाजले. नंतर त्यांना फासावर लटकावले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

संजयकुमारची सुरु होती विभागीय चौकशी...
- 16 एप्रिल 2016 चे हे प्रकरण आहे. कुसमुंडामध्ये ड्यूटीदरम्यान CISFच्या स्पेशल टीमची सरप्राइज चौकशी झाली होती.
- ड्युटीवर असताना संजयकुमारसह सुरेश एच आणि पप्पू शाह यांच्याकडे 1400 रुपये सापडले होते. एरव्ही ड्युटीवर असताना 50-50 रुपये ठेवण्याचे निर्देश आहेत. या प्रकरणी तिघांची चौकशी सुरु होती.
- चौकशीवरून संजयकुमारला नैराश्य आले होते. आपल्या प्रामानिकपणावर संशय करण्यात आल्याचा त्याला मोठा मानसिक धक्का बसला होता.
आधीपासूनच केले होते आत्महत्येचे प्लानिंग...
- संजयकुमारच्या घरात एक विषाची बाटली तसेच विषारी पावडरची पुडीही सापडली आहे.
- बाटलीतील विष हे हार्ड पॉयझन असल्याचे एफएसएल टीमने सांगितले आहे. पे प्राशन केल्यानंतर व्यक्तीची जिवंत वाचण्याची शक्यता फारच कमी असते.

पुढील की स्लाइड्सवर पाहा, या घटनेशी संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...