आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थ कुंभमेळ्याआधी जप्त स्फोटकांचा तपास, पिशवीत होते जिलेटिन रॉड आणि डिटोनेटर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्फोटकांची तपासणी करणारे पथक. - Divya Marathi
स्फोटकांची तपासणी करणारे पथक.
उज्जैन - सिंहस्थ कुंभमेळ्याआधी शहरात बॉम्बस्फोट करण्याचा कट शनिवारी उधळण्यात आला. येथील मुलांच्या खासगी वसतिगृहातील खोली क्रमांक २१२ मधून पोलिसांनी दोन किलो द्रवरूप बॉम्ब, द्रवरूप जिलेटिन व २६ डिटोनेटर, कॉर्डेक्स व मोबाइल जप्त केले आहेत. बॉम्बविरोधी पथकाने स्फोटके नष्ट केली. संबंधित खोलीजवळच्या खोली क्रमांक २१३ मध्ये राहणाऱ्या साजिद अन्सारीची चौकशी केली जात आहे. दरम्यान, जप्त केलेली स्फोटके रविवारी प्रयोगशाळेत पाठवण्यात आली.

पोलिस अधीक्षक मनीष खत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी छावणी रस्त्यावरील रहिवासी साजिश वाहिदने दोन दिवस थांबण्यासाठी खोली घेतली होती. त्याच्याकडे एक काळ्या रंगाची पिशवी होती. ओळखीसाठी त्याने आधार कार्ड जमा केले होते. साजिशने जेवण करून येत असल्याचे सांगितले होते. मात्र, रात्री दोन वाजेपर्यंत तो हॉटेलवर परत आला नाही. हॉटेल चालकांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यांनी सकाळपर्यंत वाट पाहण्यास सांगितले. शनिवारी दुपारी तो न परतल्याने पुन्हा पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी खोलीचे कुलूप तोडून झडती घेतली तेव्हा पिशवीत स्फोटके सापडली.

यानंतर बॉम्बनाशक पथकाला पाचारण करण्यात आले. पिशवीत डझनभर जिलेटिन, डिटोनेटर, कपडे व कागदपत्रे मिळाली. पोलिसांनी द्रवरूप बॉम्बला दुजोरा दिला नाही.

मोबाइलवर कॉल येताच स्फोट
संबंधित वसतीगृहात जवळपास ३० राहत आहेत. पोलिसांनुसार, बाॅम्बला मोबाइलला जोडून शक्तीशाली स्फोट केला जाऊ शकत होता. मोबाइल फोनवर कॉल येताच स्फोट झाला असता. स्फोटाचा परिणाम त्या इमारतीसह आसपाच्या घरांवरही झाला असता.
बातम्या आणखी आहेत...