आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय नेता म्हणून २ वर्षेच जगलो असतो, ‘विप्रो’चे अझीम प्रेमजी यांचे वक्तव्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - ‘राजकारण करण्यासाठी असंवेदनशीलता हीच पहिली अट आहे. मी राजकारणात असतो तर त्याने दोन वर्षांतच माझा बळी गेला असता,’ असे मत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रो या कंपनीचे प्रमुख अझीम प्रेमजी यांनी शनिवारी व्यक्त केले. आयआयएम बंगळुरूत ‘परोपकाराचा व्यवसाय’ कार्यक्रमात ते बोलत होते. प्रेमजी यांनी जवळपास ७० हजार कोटी रुपये दान केले आहेत.

प्रेमजी म्हणाले, ‘राजकारणात परोपकाराची दृष्टी असणाऱ्या प्रतिभावंतांची कमतरता आहे. चांगली भावना असलेले लोक राजकारणात यावेत. मी परोपकार १४-१५ वर्षांपूर्वी सुरू केला. मी खूप उशिरा ही कृती केली याचा पश्चात्ताप होत आहे. परोपकारासाठी पैसे देण्यातही अनेक आव्हाने आहेत. पैसा असूनही तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही हेच सर्वात मोठे आव्हान आहे. तुम्ही परोपकार का करता, असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. ज्या देशात एवढी गरिबी आहे, जेथे एवढा भ्रष्टाचार होतो, जेथे एवढे लोक वंचित आहेत, तेथे परोपकार हीच पद्धत योग्य आहे, असे मला वाटते. माझ्या आईकडून मला ही प्रेरणा मिळाली. ती मुंबईत डॉक्टर होती. दानाबाबत आपण भारतीय सध्या तरी अमेरिकन नागरिकांपेक्षा मागे आहोत. कारण आपल्याकडे कुटुंबाचा आकार मोठा असतो. त्यांचा संपत्तीत वाटा असतो. दुसरे कारण म्हणजे आपल्या मुलांसाठी संपत्ती मागे ठेवून जाऊ,अशी भावना असते. तरीही पूर्व-पश्चिम अथवा उत्तरेपेक्षा दक्षिण भारतातील लोक जास्त दान करतात.’
बातम्या आणखी आहेत...