आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतः जाळ्यात अडकला दहशतवादी बुऱ्हान, मारला गेला तेव्हा होता नशेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - हिज्बुलचा पोस्टर बॉय आणि कुख्यात दहशतवादी बुऱ्हान मुझफ्फर वणी लष्कराच्या जाळ्यात कसा अडकला ? तो स्वतः आला होता की त्याला बोलावले गेले होते ? दहशतवाद्याच्या खात्म्याचा प्लॅन कसा तयार केला गेला ? या मिशनमध्ये किती लोक होते ? या सर्व प्रश्नांवर या मिशनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलते केले आहे आमच्या प्रतिनिधी उपमिता वाजपेयी यांनी.

8 जुलैच्या संध्याकाळी आर्मी कँपला माहिती मिळाली की बुऱ्हान वणी कोकरनाग जवळील बमडूरा गावातील एक घरात पोहोचला आहे. त्याच्याकडे मोठो शस्त्रसाठाही नाही. खबर पक्की होती. कारण इंटिलीजन्स आणि आर्मीनेच वणीला त्या गावात बोलावण्याचा प्लॅन तयार केला होता. वणीला त्याच्या गर्लफ्रेंडच्या माध्यमातून बोलावण्यात आले होते. वणी त्याचा साथीदार सरताजसोबत फिरत असायचा. सरताजचा फोन गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर होता. त्या दिवशीही वणी त्याचा मित्र सरताज आणि परवेझ यांच्यासोबत होता.
जिथे वणी लपलेला होता तिथे आधी आग लावण्यात आली
> वणी आल्याच्या बातमीची खात्री झाल्यानंतर आर्मीने 100 जवान आणि पोलिसांच्या एसओजीच्या 35-36 जवानांसह कोकरनाग भागात डबल लेअर वेढा टाकला.
> आर्मी वणीला ठार मारण्याची ही सुवर्ण संधी सोडू इच्छित नव्हते.
> त्यांनी थेट फायरिंग करण्याऐवजी तो ज्या घरात लपला होता त्याला मागून आग लावली.
> इस्लाममध्ये आगीत जळून मरणे निषिद्ध मानले जाते. त्यामुळेत आग लागताच वणी आणि त्याचे साथीदार बाहेर पडले.
> त्यावेळी वणी नेशत होता. त्याला धड चालताही येत नव्हते. परवेझ आणि सरताज या त्याच्या साथीदारांनी हाताला धरुन त्याला बाहेर आणले होते.
> संधी मिळताच जवानांनी त्याला वेढा टाकला. वणी काही म्हणण्याआधीच अवघ्या चार फुटांवरुन त्याच्यावर गोळीबार करण्यात आला.
> जवानांचे टार्गेट फक्त वणी होता. त्याच्या साथीदारांना जीवंत पकडण्याचा प्लॅन होता.
> परवेझ आणि सरफराज यांनी उलट फायरिंग सुरु केल्यानंतर जवानांनी तत्काळ त्यांनाही निशाणा बनवले.
> तिघांचा खात्मा झाला होता. जवानांनी लगेच त्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. वणीजवळ फक्त एक पिस्टल सापडली होती.
> सर्वसाधारणपणे तो बुलेटप्रुफ जॅकेट, कॉम्बेट ड्रेसमध्ये राहायचा. मग तो त्याच्या ठिकाण्यांवरुन सोशल मीडिया जरी हँडल करत असला तरी त्याचा पेहराव असाच असायचा. मात्र त्या दिवशी तो साध्या कपड्यांमध्ये होता.
> तिथे त्याला ईद मिलनच्या निमीत्ताने बोलावण्यात आले होते. जवळपास दीड तासानंतर टीमने वरिष्ठ अधिकाऱ्यांना बुऱ्हान मारला गेल्याची माहिती पाठवली.
पुढील स्लाइडमध्ये, खोऱ्यातील स्थिती, जवानासह व्हॅन झेलमध्ये

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...