आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखिलेश यादवचे ‘एकला चलो रे’, व्हिडिओ जारी; पिता-काका गायब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - समाजवादी पक्षात फूट पडल्याचे स्पष्ट संकेत गुरुवारी स्वत: मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिले. अखिलेश यांनी एक व्हिडिओ जारी केला असून साडेतीन मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये ते कुटुंबापासून वेगळ्या दिशेने जाण्यासाठी पाऊल उचलल्याचे स्पष्ट होते. यात पक्षाचा झेंडा दिसून येत नाही की त्यांचे सायकल चिन्ह गायब झाले आहे. पिता मुलायम आणि काका शिवपाल यांचेही दर्शन होत नाही. मात्र, त्यांची तीन मुले आणि पत्नी डिंपल यादव दिसते. याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. त्यांनी समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारची कामगिरी सांगण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांना मतदारसंघात जाण्याचे आदेश दिले आहेत.  ते म्हणतात, सत्तेत आल्यावर आम्ही पुन्हा त्याच  योजना राबवणार आहोत. पक्षात माजलेल्या यादवीबद्दल कार्यकर्त्यांनी विचारले असता, एक-दोन दिवसात पक्ष आणि निवडणूक चिन्हांची घोषणा करण्यात येईल. लवकच प्रचार मोहिमही प्रारंभ करु असे त्यांनी सांगितले.
जाहीरनामा : समाजवादी कँटीन :  समाजवादी पक्षाच्या जाहीरनाम्यात समाजवादी कँटीन आणण्याची व   तरुणांना स्मार्टफोन देण्याचे आश्वासन आहे.
 
चिन्हावर आज निर्णय
अखिलेश बाइक, मुलायमसिंह नांगरधारी शेतकरी अशी चिन्हे घेऊन लढू शकतात.
निवडणूक आयोग गुरुवारी पक्ष आणि निवडणूक  चिन्हावर दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेईल. संध्याकाळपर्यंत निर्णय देण्याची शक्यता आहे. यामुळे अखिलेश यांनी बाइक आणि मुलायमसिंहानी नांगरधारी शेतकरी अशा चिन्हावर निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. नांगरधारी शेतकरी हे चिन्ह लोकदलाचे आहे. राष्ट्रीय लोकदलाशी याबाबत बोलणी 
झाली आहे.
 
-अखिलेशवर होणारा घराणेशाहीचा आरोप पुसून टाकण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. 
- अखिलेशकडून शपथग्रहण केल्यापासून हा व्हिडिओ सुरू होतो. राज्याचे भवितव्य उज्ज्वल करण्याचे मी आश्वासन देतो, अशी शपथ त्यांनी घेतली आहे. 
- नाष्ट्याच्या टेबलावर अखिलेश,  त्यांची पत्नी डिंपल आणि मुलांसोबत दिसतात. ते  मुलांसाेबत क्रिकेट खेळत आहेत तर विकासाचे निर्णय घेणाऱ्या बैठकीतही दिसत आहेत.  यातून समाजवादी पक्ष गायब आहे.
- विविध मुद्द्यांवर डिंपल यादवसोबत चर्चा करताना दिसत आहेत.
- पक्षाच्या झेंड्याऐवजी राष्ट्रीय ध्वज तिरंगा दिसतो आहे. सायकल हे पक्षाचे निवडणूक चिन्ह दर्शवताना कोठेही दिसले नाही.
- हा व्हिडिओ उत्तर प्रदेश... माझे कुटुंब असा संदेश देऊन संपतो. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)