आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26 एन्काउंटर केलेत या Real पोलिसाने, आता अॅक्टर बनून करताहेत कमाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड मूव्ही राजसिम्हामध्ये हिरोइन संजनासोबत अनिरुद्ध सिंह. सध्या त्यांची पोस्टिंग इलाहाबादमध्ये आहे. - Divya Marathi
कन्नड मूव्ही राजसिम्हामध्ये हिरोइन संजनासोबत अनिरुद्ध सिंह. सध्या त्यांची पोस्टिंग इलाहाबादमध्ये आहे.
इलाहाबाद - पूर्वांचलातील खतरनाक गुंडांना धडकी भरवून चर्चेत आलेले यूपीचे पोलिस इन्स्पेक्टर अनिरुद्ध सिंह तेलगू सिनेमातून शानदार एंट्री केली आहे. त्यांचा सिनेमा 'डॉक्टर चक्रवर्ती' 14 जुलै रोजी तेलंगणामध्ये रिलीज होईल. त्यांना एन्काउंटर स्पेशालिस्ट आणि दबंग म्हणून ओळखले जाते. सध्या त्यांची पोस्टिंग इलाहाबादमध्ये आहे.
 
सिनेमातही आहे पोलिसाची भूमिका
- आतापर्यंत अनेक सिनेमांतून लहान-मोठ्या भूमिका करणाऱ्या एन्काउंट स्पेशालिस्ट अनिरुद्ध सिंह यांनी रील लाइफमध्येही पोलिसाचीच भूमिका केली आहे.
- हा त्यांचा सोलो हीरो म्हणून पहिलाच सिनेमा आहे. टॉलीवूडच्या सिनेमात ते एसीपीचा रोल करत आहेत.
- ते म्हणतात की, हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. यात प्रेक्षकांसाठी एक मेसेज आहे. या सिनेमाचे डायरेक्टर शेखर सुरी आहेत.
 
असे सुरू झाले फिल्मी करिअर
- अनिरुद्ध यांनी याआधी शेखर सुरीच्या 'गन्स ऑफ बनारस'मध्येही भूमिका केली आहे. दोघांची भेट बनारसमध्ये एका फिल्म शूटिंगदरम्यान झाली. पहिल्याच भेटीत शेखर यांना अनिरुद्ध हीरो म्हणून खूप आवडले. यानंतर यूपीच्या या धडाकेबाज पोलिस इन्स्पेक्टरचे फिल्मी करिअर सुरू झाले.
 
केले आहेत 26 एन्काउंटर, 2005 मध्ये आले चर्चेत
- अनिरुद्ध सिंह जालौनचे रहिवासी असून ते 2001 च्या बॅचचे इन्स्पेक्टर आहेत.
- वाराणसी, जौनपूर, चंदौलीमध्ये आपल्या कार्यकाळात ते खूप चर्चेत राहिले. त्यांनी आतापर्यंत 26 एन्काउंटर केले आहेत. 
- 2005 मध्ये त्यांच्या दबंग स्वभावाचा दाखला मिळाला. वाराणसीत बंदोबस्तादरम्यान एका 50 हजारांचे इनाम असलेल्या आरोपीने त्यांच्यावर गोळीबार केला. जखमी झाल्यानंतरही अनिरुद्ध सिंह यांनी एकट्यानेच त्या बदमाशाचा खात्मा केला होता.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...