आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजी विकून आयआयटी गाठले; आता देतात ऑनलाइन प्रशिक्षण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोकारो- झारखंडच्या बोकारो जिल्हा मुख्यालयापासून ७ किमी अंतरावर सतनपूर गाव आदर्श ठरत आहे. येथील मुले सायंकाळ होताच एकत्र येऊन अभ्यास करतात. एक व्यक्ती संगणकावर दुसऱ्या ठिकाणावरून ऑनलाइन असतो आणि तो एकेकाशी चर्चा करत असतो. प्रश्नोत्तरे व सराव सुरू होतो. रोज दोन तास असा वर्ग चालतो. मुलांच्या शिक्षणासाठी स्वत:ला वाहून घेतलेला हा ध्येयवेडा अन्य कोणी नाही तर आयआयटी चेन्नईत पीएच. डी. करणारे झालू गोराई आहेत.

 

विशेष म्हणजे स्वत: भाजी विकून त्यांनी अायआयटीत प्रवेश प्राप्त केला. आपल्याप्रमाणेच अन्य कुणी शिक्षणासाठी संघर्ष करू नये, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे सुट्यांत घरी आल्यानंतर गावातील मुलांना एकत्र करून त्यांना शिकवण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांत माध्यमिकपासून उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. वर्षातून दोन ते तीन वेळेस १५-१५ दिवस वर्ग घेतात. मुलांच्या शिक्षणासाठी तेवढे पुरेसे नव्हते त्यामुळे त्यांनी ऑनलाइन शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गावातीलच शिक्षक विनोदकुमार यांच्यासह अन्य पाच जणांना सोबत घेतले आहे. त्यांच्या वर्गाचा २०० विद्यार्थी लाभ घेत आहेत.  

बातम्या आणखी आहेत...