आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तेलंगणमध्ये रेशन दुकाने, गोदामांत लावणार सीसीटीव्ही कॅमेरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद | जनतेला वाजवी दरात रेशनचे सामान मिळावे या दिशेने तेलंगण सरकारने अत्याधुनिकीकरण मोहीम हाती घेतली आहे. राज्यातील रेशन दुकानांना पूर्णत: स्वयंचलित तंत्राने नवे रूप देण्यात येत आहे. ई-पॉस (इलेक्ट्रॉनिक पाँइट ऑफ सेल) मशीन्स बसवण्यात आल्या आहेत.
रेशन दुकानांच्या गोदामांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आणले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिकाधिक पारदर्शी करण्याच्या दिशेने काम करायचे असेल तर आधार कार्ड अनिवार्य ठरणार आहे. सार्वजनिक वितरण विभागाचे आयुक्त सी. व्ही. आनंद यांनी भावी आधुनिकीकरण प्रक्रियेविषयी माहिती दिली. राज्यात १७,२०० रेशन दुकाने असून त्यांना पूर्णत: स्वयंचलित करण्यात येईल.
बातम्या आणखी आहेत...