आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Intensity Of Cyclone Reduced To 90 100 Kmph In Odisha\'s Gopalpur

फायलिनने घेतले 20 बळी, 80 लाख लोक प्रभावित, मालवाहू जहाज बुडाले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोपालपूर/ भुवनेश्वर/ नवी दिल्ली - आजवरचे सर्वांत भयंकर चक्रीवादळ ‘फायलिन’मुळे देशभर, विशेषत: किनारपट्टीवरील राज्यांत प्रचंड दहशत आहे. फायलिन चक्रीवादळाचा ओडीशामध्‍ये जोर ओसरु लागला आहे. रात्रभर वादळी वारे आणि मुसळधार पावसाचे थैमान सुरु होते. दिवस उजाडल्‍यानंतर फायलिनच्‍या तडाख्‍याचे परिणाम दिसू लागले आहेत. बंगालच्‍या उपसागरात एम.व्‍ही. बिंगो नावाचे एक मालवाहू जहाज बुडाल्‍याची भीती व्‍यक्त करण्‍यात येत आहे. पनामा येथील हे नोंदणीकृत जहाज चीनमधून सुमारे आठ हजार टन लोहखनिज घेऊन जात होते. कोलकताच्या बंदराच्या पूर्व दिशेकडील सागरामध्ये सुमारे 25 किमी अंतरावर या जहाजामधील कर्मचारी एका नौकेत बसल्याचे आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. फायलिनपासून बचाव करण्‍यासाठी जहाज कोलकात्‍याला परतत होते. जहाजावर चीनचे 19 आणि इंडोनेशियाचा एक नागरिक असे एकूण 20 जण होते.

फायलिनचा जोर ओसरला असला तरीही आता बिहार आणि झारखंडमध्‍ये अतिवृष्‍टी आणि पुराचा इशारा देण्‍यात आला आहे. रांचीमध्‍ये सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. ओडीशामध्‍ये वीजपुरावठा प्रभावित राहणार आहे. उच्‍च दाबाच्‍या वाहिन्‍या आणि टॉवर्सचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच रेल्‍वे सेवेवर सर्वाधिक परिणाम होणार आहे. अनेक ठिकाणी रेल्‍वे रुळांवर झाडे उन्‍मळून पडली आहेत. काही ठिकाणी सिग्‍नलचे खांब पडल्‍याचे चित्र आहे. तर, काही ठिकाणी रुळांखाली असलेला भराव वाहून गेला आहे. रेल्‍वे प्‍लॅटफॉर्मचेही अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. वादळाचा जोर कमी होऊ लागल्‍यानंतर रेल्‍वेचे आपात्‍कालीन पथक आणि तांत्रिक कर्मचा-यांना दुरुस्‍तीसाठी सज्‍ज ठेवण्‍यात आले आहे. दुरुस्‍तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्‍यात येणार आहे. दरम्‍यान, पारादीप येथे अडकलेल्या 18 मच्‍छीमारांना सुखरूप परत किना-यावर आणण्‍यात आले आहे.

फायलिनचा तडाखा... अधिक छायाचित्रे आणि सविस्‍तर म‍ाहितीसाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...