आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाशीपूर्वी आरोपीला अंतिम इच्छा विचारली जातच नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - फाशीची शिक्षा देण्यापूर्वी आरोपीला त्याची अंतिम इच्छा विचारण्याची पद्धत आपल्याला माहीत आहे. परंतु ही प्रथा फक्त चित्रपटांतच बघावयाला मिळते, प्रत्यक्षात नाही. याबाबत तुरुंग किंवा पोलिसांच्या नियमांत कोठेही उल्लेख नाही. छत्तीसगडच्या रायपूर तुरुंगात कैदेत असलेला आरोपी सोनू सरदार याच्या फाशीच्या निर्णयानंतर हा मुद्दा जोर धरू लागला आहे.

दिव्य मराठी नेटवर्कने या मुद्याच्या खोलापर्यंत जाऊन याविषयीची माहिती गोळा केली आहे. परंतु फाशीपूर्वी आरोपीची शेवटची इच्छा विचारण्याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. इंग्रजांच्या काळातही फाशीपूर्वी कोणतीही इच्छा विचारली जायची नाही किंवा त्यानंतरही अशाप्रकारची पद्धत रूढ नव्हती, असे चौकशीत आढळून आले आहे. मात्र, चित्रपटांमध्ये फाशीच्या आरोपीला त्याची अंतिम इच्छा विचारली जाते आणि ती पूर्ण करण्याचाही प्रयत्न केला जातो. सोनू सरदाराच्या फाशीच्या शिक्षेला आव्हान देण्यासाठी दिल्लीच्या एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याची सुनावणी लवकरच होणार आहे.