आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईने कर्ज काढून शिकवले या पंतप्रधानांना, मुलाने सरकारी गाडी वापरल्यावर स्वत: भरले पैसे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आई आणि पत्नीसह लालबहादूर शास्त्री. - Divya Marathi
आई आणि पत्नीसह लालबहादूर शास्त्री.
वाराणसी - लालबहादूर शास्त्री यांचा जन्म काशीमधील रामनगरमध्ये शिक्षक असलेल्या मुन्शी शारदा प्रसाद यांच्या घरी 2 ऑक्टोबर 1904 रोजी झाला होता. लहानपणी वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर घराची पूर्ण जबाबदारी आई रामदुलारी यांच्यावर आली. गरिबीत असतानाही कर्ज काढून त्यांनी शास्त्रीजींचे शिक्षण केले. साहित्यिक नीरजा माधव यांनी शास्त्रीजींच्या जीवनावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. divyamarathi.com शी विशेष चर्चा करताना त्यांनी सांगितले की, शास्त्रीजींनी नेहमी आपल्या भाषणांमध्ये हेच सांगितले की, परमाणू शस्त्रास्त्रे समुद्रात सोडू नये. पाण्यात राहणारे लाखो जलचर यामुळे नष्ट होतील. पर्यावरणाचे संतुलन ढासळून जाईल.
 
नदीत पोहून जात होते शिकायला
- लहानपणी शास्त्रीजींना शिक्षणासाठी रोज गंगा नदी पोहून जावे लागत होते. डोक्यावर दप्तर आणि कपडे ठेवून शास्त्रीजी अनेक किलोमीटर लांब असलेल्या गंगा नदीला सहज पोहून पार करायचे. शाळेत हुशार असल्याने लहानपणी त्यांना 3 रुपये स्कॉलरशिप मिळायची.
- देशाचे पंतप्रधान बनल्यानंतरही शास्त्रीजींना त्या व्यक्तीचा विसर पडला नाही, ज्यांनी त्यांना थापड मारली होती.
- हरिश्चंद्र इंटर कॉलेजमध्ये हायस्कूलच्या शिक्षणादरम्यान त्यांनी प्रयोगसाहित्य तोडले होते. शाळेचे चपराशी देवीलाल याने त्यांना पाहिले होते. देवीलालने शास्त्रीजींना जोरात थापड मारली आणि लॅबच्या बाहेर काढले होते.
- रेल्वेमंत्री बनल्यानंतर 1954 मध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी स्टेजवर जाताना देवीलाल त्यांना पाहताच बाजूला झाले. परंतु शास्त्रीजींनी देवीलाल यांना ओळखले आणि स्टेजवर नेऊन त्यांचा सन्मान केला.
 
नेहमी सामान्य माणसाप्रमाणे राहिले शास्त्रीजी
- शास्त्रीजींना कोणत्याही कार्यक्रमात व्हीव्हीआयपीप्रमाणे नाही तर सामान्य माणसाप्रमाणे राहणे पसंत होते.
- दुपारच्या जेवणात नेहमी ते वरण-चपाती घ्यायचे. कार्यक्रमाचे आयोजक मात्र तऱ्हेतऱ्हेची पक्वान्ने बनवत होते. अशा वेळी शास्त्रीजी त्यांना रागे भरायचे आणि समजून सांगायचे की, गरीब माणूस उपाशी झोपतोय आणि मंत्री बनून मी पक्वान्न खावे, हे शोभत नाही.
 
सरकारी कारने कॉलेजला गेला म्हणून मुलाला रागावले
- एकदा शास्त्रीजी एका कार्यक्रमात आले होते तेव्हा एका सहकाऱ्याने त्यांना टोकले की, तुमचा शर्ट एका बाजूने फाटलेला आहे. शास्त्रीजींनी विनम्रतेने उत्तर दिले- गरिबाचा मुलगा आहे. असा राहिल्यावरच गरिबांचे दु:ख मला जाणवत राहील.
- शास्त्री पंतप्रधान होते तेव्हा त्यांचा मुलगा सुनील शास्त्री एकदा सरकारी कारने कॉलेजला गेला होता. यावर शास्त्रीजी ड्रायव्हर आणि मुलगा दोघांना रागावले व म्हटले- भारत सरकारची कार जनतेच्या सेवेसाठी आहे. त्यांनी त्या वेळी आपल्या पगारातून साडेचार रुपये इंधनाचे भारत सरकारच्या तिजोरीत जमा करायला लावले होते.
- शास्त्रीजी जेव्हा पोलिस मंत्री होते तेव्हा देशात पहिल्यांदा लाठीचार्जऐवजी पाण्याचा फवारा वापरण्याचे आदेश जारी करण्यात आले होते, कारण कोणीही जखमी होऊ नये.
- ते परिवहन मंत्री असताना सर्वात प्रथम महिला कंडक्टरांची नियुक्ती झाली होती.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...