आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मथुरेत उभारणार सर्वात भव्य मंदिर, कुतूबमिनारपेक्षा तीन पट राहिल उंची, वाचा Facts

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मथुरा - येथे जगातील सर्वात उंच अशा चंद्रोदय मंदिराच्या निर्मितीचे काम सुरू आहे. या कामात सुमारे एक हजार मजूर आणि इंजिनीअर परिश्रम घेत आहेत. 511 पिलरवर 210 मीटर (70 मजली) उंच इमारतीचा भार असेल राधाष्टमीच्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी येथे राधा आणि कृष्णाचा अभिषेक करण्यात आला. चंद्रोदय मंदिराचे प्रोजेक्ट डायरेक्टर सुबयक्‍ता नरसिंहा दास यांनी या मंदिराबाबतची रंजक माहिती शेअर केली आहे.
जाणून घ्या मंदिराबाबतची वैशिष्ट्ये..
- इस्कॉन सोसायटीने वृंदावनमध्ये जगातील सर्वात उंच मंदिराची निर्मिती सुरू केली आहे.
- त्यांनी सांगितले की, 2022 मध्ये हे मंदिर तयार होणार आहे. सध्या याठिकाणी एक हजार मजूर काम करत आहेत. एका वर्षात ही संख्या तीन पटीने वाढणार आहे.
- मंदिरासाठी जवळपास 700 कोटींपेक्षा अधिक खर्च होणार आहे.
- संपूर्ण इमारत 511 पिलरवर असेल. या पिलरवर संपूर्ण बिल्डींगचा म्हणजे 5 लाख टन एवढा भार असेल. या पिलरची क्षमता 9 लाख टन वजन पेलण्याची आहे.
- मंदिराची उंची 700 फूट असल्याने त्यावर विमानाद्वारे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असेल. या मंदिरात वर्ल्‍ड ट्रेड सेंटर सारखा हल्ला होऊ नये यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
- मंदिराचा परिसर 50 एकरचा असेल. त्याठिकाणी सहा हेलिपॅड तयार करण्याची योजना आहे.
- चंद्रोदय मंदिर हे पिरॅमिडचे आधुनिक रुप असेही म्हणता येईल.
- 2006 मध्ये याबाबत योजना आखण्यात आली. त्यानंतर 8 वर्षांच्या तयारीनंतर 2014 मध्ये याच्या कामाला सुरुवात झाली.
- प्रोजेक्ट डायरेक्टर दास यांच्यामते, याचा पाया कुतूबमिनाराच्या उंचीएवढा खोल करण्यात आला आहे.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, या मंदिराशी संबंधित रंजक Facts..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...