आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interesting Facts And Seats Analysis About Fourth Phase Of Bihar Election

बिहार : चौथ्‍या टप्प्यात 57.59 टक्‍के मतदान, शिवहरमध्‍ये पोलिसांवर दगडफेक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मतदान केंद्रावर असलेला कडक पोलिस बंदोबस्‍त. - Divya Marathi
मतदान केंद्रावर असलेला कडक पोलिस बंदोबस्‍त.
पाटणा - बिहार विधानसभेच्या चौथ्‍या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज (रविवार) सकाळी 7 वाजता सुरू झाली. सायंकाळपर्यंत बिहारमध्ये 57.59 टक्‍के मतदान झाले. या विभानसभा क्षेत्रात लोकसभेचे सात मतदार संघ येतात. वर्ष 2014 मध्‍ये झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत सहा जागेवर भाजपचे उमेदवार निवडून आले होते. त्‍यामुळे आपले वर्चस्‍व कायम ठेवण्‍यासाठी भाजपवर सर्वाधिक दबाव आहे. यामध्‍ये पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, शिवहर, सीतामडी, मुजफ्फरपूर, गोपालगंज आणि सिवान या सात जिल्‍ह्यात हे मतदान होत आहे. या ठिकाणी एकूण 55 विधासभा मतदार संघ आहेत.
जवानांनी म्‍हटले, भाजप सोडून कुणालाही मत द्या
मुजफ्फरपूरच्‍या गायघाट येथील बूथ क्रमांक 92 आणि 93 वर प्रोजायडिंग अधिकारी आणि सीआरपीएफ जवान भाजप सोडून इतरांना मत देण्‍यासाठी दबाव आणत आहे, असा आरोप मतदानांनी केला. दरम्‍यान, या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राज्या रोको आंदोलनही केले. एवढेच नाही तर डीएसपीच्या गाडीची तोडफोड केली.
शिवहरमध्‍ये पोलिसांवर दगडफेक
पूर्व चम्पारण जिल्‍ह्यातील पकडी दयालमध्‍ये आमदार शिवजी राय यांनी मतदान केंद्राच्‍या कामात हस्‍तक्षेप केल्‍याचा आरोप त्‍यांच्‍या विरोधकांनी केला. त्‍यामुळेच एकच गोंधळ उडाला. दरम्‍यान, परिस्‍थ‍ितीवर नियंत्रण मिळवण्‍यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला तर काहींनी पोलिसांवर दगडफेक केली.

शेवटचा टप्‍पा 5 नाव्‍हेंबरला
बिहारमध्ये 5 टप्प्यात हे मतदान होत आहे. पहिला टप्पा 12 ऑक्टोबर, दुसरा 16 ऑक्टोबर आणि 18 ऑक्टोबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले तर आज चौथ्‍या टप्‍प्‍यातील मतदान होत आहे. 5 नोव्हेंबरला पाचव्या टप्प्यातील मतदान होईल. 8 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
तिसऱ्या टप्‍प्‍यात झाले होते 53.32 टक्के मतदान
तिसऱ्या टप्‍प्‍यात 50 जागांसाठी हे मतदान झाले. या टप्प्यात एकूण 53.32 टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान म्हणजे 56.52 टक्के बक्सर येथे झाले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, संबंधित फोटो..