आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षातून एकदाच उघडते धनकुबेराचे हे मंदिर, अशी आहे अद्भुत कथा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- मंदसौर येथील खिलचीपूर येथे कुबेराचे एक असे दूर्मीळ मंदिर आहे, जे वर्षातून एकदाच उघडते. जवळपास 1400 वर्ष जूनी कुबेराची प्रतिमा चंद्रगुप्तच्या काळातील मानली जाते. हे मंदिर देवतांनी दूसरीकडून याठिकाणी स्तलांतरीत होते. वर्षातून केवळ धनत्रयोदशीच्या दिवशी उघडणाऱ्या या मंदिराचे दरवाजे मंगळवारी सकाळी 4 वाजता उघडण्यात आले. कुबेर मंदिरात पूजेसाठी मध्यप्रदेशासह, राजस्थान, गजरात व अन्य राज्यांतून भक्त मंदसौर येथे येतात.

- खिलचीपूरा येथील हे शिव-कुबेर मंदिर एक अनोखे मंदिर आहे. याला धवलेश्वर धोरागड महादेवाच्या नावाने देखील ओळखले जाते. येते 4 फूट उंच शिवलिंग आहे आणि जवळच भिंतीवर पश्चिममुखी कुबेराची मुर्ती कोरलेली आहे.  
 
- या मंदिराच्या गाभाऱ्यात भक्तांना वाकूनच जावे लागते, कारण दरवाजाची उंची केवळ तीन फूट आहे. मंदिराच्या सुरक्षेसाठी 20 वर्षांपूर्वी नंदीगृहात भिंत बनवण्यात आली होती. जाळीचे दरवाजे देखील लावण्यात आले होते. परंतु, मंदिराचे गर्भगृह धनत्रयोदशीच्या दिवशीच खुले करण्यात येते.

- इतिहासविद् डॉ. कैलाश पांडे यांच्या मते, कुबेराची ही मुर्ती उत्तर गुप्तकाळातील 7 व्य शतकात निर्माण झाली आहे. माराठा काळात धोलगिरी महादेव मंदिरातच्या निंर्मीतीदरम्यान या मुर्तीची स्थापना करण्यात आली होती. या मंदिरात भगवान गणेश व माता पार्वतीची मुर्ती देखील आहे. डॉ. पांडे सांगतात की, 1978 मध्ये मुर्ती गर्भगृहात दिसली होती.
 
दीड हजार वर्ष जूनी आहे मुर्ती...
पुजारी कन्हैयालाल गिरी यांनी सांगितले की, दुर्मीळ कुबेराची मुर्ती ही दीड हजार वर्ष जूनी असून ही गुप्तकाळातील असल्याची मान्यता आहे. सुरूवातीला मुर्ती दुसऱ्या कुठेतरी असावी, त्यानंतर ती खिलचीपूरा येथील शिव मंदिरात स्थापन करण्यात आली. कुबेराची सर्वात मोठी मुर्ती आणि प्रसिद्धीमुळे लोक याला कुबेर मंदिराच्या नावाने ओळखतात.

पुजारी पं. हेमंत गिरी गोस्वामी यांनी सांगितले की, धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर मंदिराचे दरवाजे सकाळी 4 वाजता उघडण्यात आले. भोलेनाथसोबतच कुबोराचाही सृंगार करण्यात आला. अभिषेक-पूजा करून मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले. रात्री 12 वाजेपर्यंत भक्त देवाचे दर्शन करू शकतणार आहेत.

पुढील स्लाइडवर पाहा, मंदिराचे फोटोज्....
बातम्या आणखी आहेत...