आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International Camel Festival In Bikaner Of Rajasthan

उंटलीला : आंतरराष्ट्रीय उत्सवात उंटांच्या कसरती, डान्स केला अन् आशीर्वादही दिला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिकानेर - येथील डॉ. करणी सिंह स्टेडियममध्ये अत्यंत उत्साहात आंतरराष्ट्रीय उंट उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवामध्ये उंटांनी एकाहून एक सरस अशा कसरती सादर करत उपस्थितांची मने जिंकली. राजस्थानी गाण्यांवर थिकरणा-या या उंटांचे डान्स पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
उंटांच्या कसरतींबरोबरच याठिकाणी झालेल्या विविध खेळांमध्येही उपस्थितांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. परदेशी नागरिकांनीही या खेळांचा आनंद लुटला. दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी रात्री खास सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते.

पुढील उंट उत्सव जानेवारी 2016 मध्ये
आगामी 23वा उंट उत्सव 9 ते 10 जानेवारीदरम्यान आयोजित केला जाणार आहे. पर्यटन मुख्यालयाने आताच ऊंट उत्सवाची तारीख निश्चित केली आहे. पर्यटन विभागाचे सहायक निर्देशक अजय शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार आता जानेवारी जानेवारी महिन्याच्या प्रत्येक दुस-या शनिवारी आणि रविवारी उंट महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या उंट उत्सवातील PHOTO