आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेशातून आणल्या मुली; जयपूर - जोधपूर, मुंबई-पुण्यात अनैतिक कृत्यासाठी ओलीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - बासनी भागात तीन वर्षांपूर्वी झालेल्या मुलीच्या अपहरणामागे बंगालपासून राजस्थान सीमेपर्यंतच्या मानवी तस्करीचे जाळे कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. एका नदीकाठी वसलेले बंगालचे लक्ष्मीपूर गाव बांगलादेशपासून अवघ्या २० किमी अंतरावर आहे. या ठिकाणापासून निरागस मुलींची तस्करी केली जात आहे. टोळीचा म्होरक्या बांगलादेशातून अल्पवयीन मुलीची खरेदी करतो. त्यानंतर सीमेवर तैनात जवानांशी हातमिळवणी करून त्यांना प्रतिमुलगी ११ हजार रुपये देऊन सीमापार पोहोचवले जाते. तेथून पुढे त्यांना अनैतिक कामाच्या नरकात ढकलले जाते. या म्होरक्याच्या बँक खात्यात गेल्या ८ महिन्यांत ३५ लाख रुपये जमा झाले आहे. रक्कम जोधपूरशिवाय जयपूर, मुंबई, पुणे व गुजरातमधील अनेक शहरांतून पाठवण्यात आली होती.

पूर्व विभागाचे पोलिस उपायुक्त विनीत कुमार म्हणाले, टोळीची सर्व मोठ्या शहरांत साखळी पसरली आहे. ही साखळी चालवणाऱ्या मास्टर माइंड सुजॉय विश्वासला बांगलादेश सीमेवर पकडून जोधपूरला आणले जात आहे. त्याच्या सर्व बँक खात्याची झडती घेऊन देशातील अनेक शहरांतील अनैतिक कामासाठी ओलिस ठेवलेल्या मुलींची सुटका केली जाईल.

पुढील स्‍लाइडवर वाचा, बांगलादेशात विकल्या जातात मुली, तीन महिन्यांपूर्वी ११ जणींना आणले.... खात्यात ८ महिन्यांत ३५ लाख रुपये जमा
बातम्या आणखी आहेत...