आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5-6 हजारांत खरेदी केल्या जातात अल्पवयीन मुली, मुंबई-पुण्यात आहे तस्करांची टोळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- तीन वर्षीय चिमुरडीच्या अपहरण प्रकरणातून एक धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. ती म्हणजे, पश्चिम बंगाल ते राजस्थान बॉर्डरपर्यंत मोठ्या प्रमाणात मानव तस्करी केली जात आहे. इतकचे नव्हे तर मुंंबई-पुण्यात तस्करांची साखळी असल्याचे अटक करण्यात आलेल्या नंंदिनी रॉय हिने पोलिसांना सांगितले.

पोलिस नंंदिनीची कसून चौकशी करत आहेत. तसेच पोलिसांना जोधपूरमधील एका बंद खोलीत दोन अल्पवयीन मुली सापडल्या असून मोठे सेक्स रॅकेट उघडकीस येण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

या प्रकरणाचा धागा थेट बंगालमधील लक्ष्मीपूरशी जोडला गेला आहे. हे गाव एका नदीच्या काठावर असून तेथून बांगलादेश अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर आहे. येथून संपूर्ण देशात अल्पवयीन मुलींची तस्करी केली जाते.

8 महिन्यांत कमवले 35 लाख रुपये...
- लक्ष्मीपूरमधून मोठ्याप्रमाणात मानवी तस्करी केली जाते. बांगलादेशातून 5 ते 7 हजारांंत मुली खरेदी केल्या जातात. नंंतर बॉर्डरवर तैनात जवानांंना चिरीमिरी देऊन कोलकात्यात अाणले जाते. नंंतर त्यांना देहविक्री व्यवसायात ढकलण्यात येते. नंंदिनीने यातून 8 महिन्यांत 35 लाख रुपये कमवल्याची माहिती समोर आली आहे.
- डीसीपी ईस्ट विनीत कुमार यांनी सांगितले की, मानवी तस्करी करणार्‍या टोळीचा म्होरक्या सुजॉय विश्वास याला बांगलादेशच्या बॉर्डर अटक केेले आहे. त्याला जोधपूरला आणले जाणार आहे.
- त्याच्या बॅंंक खात्यांची चौकशी केली जात आहे. मुंबई, पुण्यासह देशातील अनेक शहरात देहविक्री व्यवसायातील अनेक मुलींंची सुटका करण्‍याचा प्रयत्न केला जाणार आहे.
- नंदिनीच्या घरावर पोलिसांनी छापेमारी केली. त्यात बनावट आयडी आणि बँकेेत रुपये डिपॉझिट केल्याच्या पावत्या सापडल्या आहेत.
- जयपूर, मुंबई, पुणे आदी शहरातून हे रुपयेे डिपॉझिट करण्यात आलेे होते. विड्रा बंगालमधील विविध एटीएममधून करण्‍यात आले आहे. सुजॉयला विशेष पोलिस पथकाला अटक केली आहे.

पुढील स्लाइड्सवरील इन्फोग्राफिक्समधून वाचा, पश्चिम बंंगाल ते राजस्थानात असेे चालत आहे सेक्स रॅकेट.....

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...