आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग धार्मिक कर्मकांड नाही, हे जीवनशास्त्र; पंतप्रधान मोदींनी दिले योगशास्त्रावर धडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योग करतान श्रीमंत-गरीब असा भेद नाही. श्रीमंत आणि गरीब दोघेही योग करु शकतात. - Divya Marathi
योग करतान श्रीमंत-गरीब असा भेद नाही. श्रीमंत आणि गरीब दोघेही योग करु शकतात.
चंदिगड - जागतिक योग दिनाचा मुख्य कार्यक्रम चंदिगडमध्ये पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांत मिसळून आसनेही केली. तत्पूर्वी सुमारे ३० हजारांच्या संख्येने योगदिनी एकत्र आलेल्या लोकांशी संवाद साधताना ते म्हणाले, योग हे काही धार्मिक कर्मकांड नाही. त्याच्याशी कोणताही वाद जोडू नका.

- मधुमेहासारखी व्याधी योगासनाच्या माध्यमातून दूर करण्यासाठी पंतप्रधानांनी सुचवले उपाय.
- सुरक्षा पथकातील जवान, शाळकरी मुले आणि विविध क्षेत्रांतील लोकांनी मोदींसोबत केली आसने.

जगभर योग दिन साजरा
- संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा योग दिन जाहीर केला आहे. हा दुसरा जागतिक योग दिन जगभर साजरा करण्यात आला.
- केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी विविध राज्यांत जाऊन योग दिन साजरा केला. जनतेत मिसळून योगासने केली.
- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवनावर उपस्थित सुमारे १ हजार लोकांसमवेत योग दिन साजरा केला.

महाराष्ट्रात... राजभवनावर राज्यपाल विद्यासागर राव यांनी तर बांद्रा येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी योग दिनानिमित्त आयोजित समारंभात सहभाग घेतला.
- मंत्रालयामधील २०० कर्मचाऱ्यांनीही मंत्रालय परिसरात याेग दिनानिमित्त योगासने केली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, योगानंतर कोणत्या हॉटेलमधून पंतप्रधानांसाठी नाष्ता ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...