आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- जगभरात सायबर हल्ल्यामुळे इंटरनेटची गती मंदावली आहे. ई-मेलवर येणा-या स्मॅम मेल रोखणा-या यंत्रणेवर सायबर चाच्यांनी चोहूबाजुने हल्ला केला आहे. भारतातही इंटरनेटची गती मंदावली आहे. परंतु, यामागे सायबर हल्ला नसून सबमरिन केबल तुटल्याचे कारण असल्याचे केंद्रीय दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केले आहे.
सबमरिन केबल तुटल्यामुळे प्रामुख्याने दक्षिण भारतातील इंटरनेट सुविधांवर परिणाम झाला आहे. सायबर विश्वात झालेल्या सर्वात मोठ्या हल्ल्याचा परिणाम म्हणून जगभरतील इंटरनेट सुविधांची गती मंदावली आहे. त्यामुळे भारततही इंटरनेट स्लो झाल्याचे बोलले जात होते. परंतु, तसे नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भारतात इंटरनेटची गती कमी होण्यामागे कुठलाही सायबर हल्ला नसल्याचे सिब्बल यांनी स्पष्ट केले. परंतु, युरोप आणि अमेरिकेत मात्र स्पॅम मेल्स रोखणाऱ्या यंत्रणांवर गेल्या आठवड्याभरात मोठ्या प्रमाणात व्हायरसच्या माध्यमातून हल्ले सुरू आहेत.
या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलेल्या संकेतस्थळावर चोहोबाजूंनी मेसेजचा जोरदार मारा केला जातो. क्षमतेपेक्षा अधिक संदेश येत असल्याने हे संकेतस्थळ पुरेशा क्षमतेने काम करू शकत नाही. ते कोलमडून पडते. प्रति सेकंदाला किती बिट्स येतात त्यावर या हल्ल्याचे स्वरूप अवलंबून असते. सध्या ही गती 300 गिगाबाईट्स एवढी असल्याचे सांगण्यात येत आहे. असे हल्ले रोखण्यासाठी स्पॅमहॉस नावाची कंपनी कार्यरत असून त्यांनी एक यंत्रणा तयार केली आहे. त्यामाध्यमातून 80 टक्के स्पॅम रोखण्यात मदत होते. आता या कपंनीलाच लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे हल्ला रोखण्यासाठी गुगल आणि क्लाउडफ्लोअर सारख्या कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. पण अजूनही त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.