आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माहितीपट, लघुपटांचे संशोधन जमेची बाजू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही त्यामागे असणाऱ्या लहान गोष्टीतून होत असते. चित्रपट क्षेत्रालाही हा नियम लागू पडतो. चित्रपटाशी संबंधित कोणत्याही क्षेत्रात काम करायचे असेल तर माहितीपट आणि लघुपटांचे संशोधन तसेच शिक्षण जमेची बाजू ठरू शकतात. सध्याचा काळ अशाच संशोधनाचा असल्याचे मनोगत आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेला कॅनडाचा भारतवंशीय युवा दिग्दर्शक रिची मेहताने व्यक्त केले. ४७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्याच्या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने रिची मेहताने ‘दैनिक दिव्य मराठी’शी साधलेला हा संवाद…
तुझ्या चित्रपटांमधून नेहमीच संवेदनशीलतेचे दर्शन घडते?
रिची- जेव्हा जेव्हा मला अशी प्रतिक्रिया दिली जाते की, माझ्या चित्रपटांमधून संवेदनशीलतेचे दर्शन घडते. तेव्हा तेव्हा मला भारताशी कायमचाच जोडून असल्याची जाणीव होत राहते. संवेदनशीलता हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असून मी तीच माझ्या चित्रपटांमधून दाखवण्याचा प्रयत्न करतो. भारतीय संस्कृती, परंपरा व भाषिक गोडवा मला आकर्षित करत राहतो. हे सर्व अंग एकत्र आल्यानंतर फक्त संवेदनशीलताच दिसून येते.
विषय निवडताना सोशल मीडियाच्या अंगानेही विचार करावा, असे म्हटले ते नेमके कसे?
रिची- आज जगभरात सोशल मीडियाचा व्याप प्रचंड वाढला आहे आणि या माध्यमातून आपण अनेक नवनवीन विषय मिळवू शकतो. मी अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून माहितीपटांचे विषय काढले आहेत. या विषयांची व्याप्तीही तितकीच जास्त अाहे. बरेचदा यातून प्रथम माहितीपट तसेच लघुपटांबाबतच्या संशोधनाचे सार मिळते आणि फिक्शन चित्रपटांचा आवका लक्षात येतो. नंतर हीच माहितीपट किंवा लघुपट पाहून चित्रपटांचे कथानक लक्षात येतात.
सध्या तरुणाई मोठ्या प्रमाणात लघुपटांच्या निर्मितीकडे वळत आहे? यामागे काय कारण?
रिची- लघुपटाकडे तरुणाई वळण्याचे कारण मला सहज सापडले आहे. सध्याची तरुणाई तंत्रज्ञान, अविष्कार आणि सृजनशीलतेच्या बाबतीत प्रचंड प्रतिभावान आहे. लघुपट हा त्यांच्यासाठी मोठा प्लॅटफॉर्म ठरत आहे. शिवाय, देशविदेशात दर्जेदार महोत्सव आयोजित केले जातात तेथे नवोदित दिग्दर्शक, निर्माते, कलाकारांचा सन्मान होत आहे. यामुळेच तरुणाईला लघुपटांची भुरळ पडली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला रिची
रिची मेहताने २००८ मध्ये ‘अमल’ हा माहितीपट दिग्दर्शित केला होता. यास २९व्या जिनी महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला, तर सिद्धार्थ आणि आय विल फॉलो यू डाऊन या त्याच्या दोन चित्रपटांनी जगभरातील प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये पुरस्कारांवर छाप सोडली आहे. रिची सध्या कॅनडाच्या मिशीसाऊगा विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेतोय.
बातम्या आणखी आहेत...