आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘भारताची पत जगात सगळीकडे, सुरक्षा परिषदेत जाणे सहजशक्य’ न्यायमूर्ती भंडारी यांची मुलाखत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - नेदरलँड इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस (आयसीजे) मध्ये भारताच्या  विजयाला अनेक अर्थांनी महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे जगभरात भारताची पत वाढली आहे. सुरक्षा परिषदेत जाण्याचा मार्ग थोडा सोपाही झाला आहे, असे प्रतिपादन आयसीजेमध्ये सलग दुसऱ्यांदा निवडून गेलेले न्या. दलबीर भंडारी यांनी फक्त दैनिक भास्करला दिलेल्या पहिल्या मुलाखतीत केेले. आयसीजेमध्ये विजय प्राप्त केल्यानंतर जोधपूर येथे आलेल्या भंडारी यांनी आपल्या विजयाचे श्रेय वडील, ईश्वर व देशवासीयांना दिले. 

 

आंतराष्ट्रीय कोर्टात या विजयाचे महत्त्व काय?

न्या. भंडारी  : आयसीजेमध्ये १९२२ ते २०१७ पर्यंतच्या दीर्घ कार्यकाळात फक्त दोन भारतीयांना दुसऱ्यांदा न्यायमूर्ती होण्याचा बहुमान मिळाला. याआधी डॉ. नगेंद्रसिंह यांना व नंतर मला स्वत:ला. येथे भारताला खूप कमी वेळा प्रतिनिधित्व मिळाले. हीच बाब भारतासाठी खूप चांगली आहे. त्यांचे न्यायमूर्ती आणखी नऊ वर्षे तेथे राहतील.


जगात भारताचा दबदबा वाढेल?
न्या. भंडारी : ही निवडणूक अद््भुत आहे. विजयासाठी संयुक्त महासभा व सुरक्षा परिषदेत पूर्ण बहुमत म्हणजे ५१ टक्के मते मिळणे आवश्यक आहे. ब्रिटनचे न्या. क्रिस्टोफर ग्रीनवूड यांनी माघार घेतली. त्यानंतरही निवडणूक झाली. यात भारताला महासभेत १९३ पैकी १८३ तर सुरक्षा परिषदेत १५ पैकी १५ मते मिळाली. यामुळे भारताची पत जगात खूप वाढली आहे, असे स्पष्ट होते.


भारताचा सुरक्षा परिषदेत जाण्याचा दावा आणखी बळकट होईल काय? 
न्या. भंडारी : दोन सभागृहात जगभरातील लोकांनी ज्या पद्धतीने भारताला विक्रमी समर्थन दिले, त्यावरून भारताचा सुरक्षा परिषदेत प्रवेश सोपा होणार आहे.


अाधीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत कशा प्रकारचा दबाव जाणवला?
न्या. भंडारी : या वेळची निवडणूक कठीण होती.  एक प्रकारे अद््भुत म्हणा ना!  खरे तर,  निवडणुकीच्या काळात मला कोणताही दबाव जाणवला नाही. मात्र, माझ्या शुभचिंतकांचा दबाव जास्त होता.

बातम्या आणखी आहेत...