आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भंवरीप्रकरणी अाडकाठी, तपास पथकाने सीबीआय संचालकांना लिहिले पत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - राजस्थानमधील बहुचर्चित भंवरीदेवी प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) राज्य सरकारवर अडथळा आणण्याचा व असहकार्य करण्याचा गंभीर आरोप ठेवला आहे. यासंदर्भात तपास पथकाने सीबीआयच्या विशेष संचालकांना पत्र लिहिले आहे. सरकारी वकिलांची टीम आणि साक्षीदारांना सतत धमक्या मिळत आहेत. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्य सचिवांनी जारी केलेल्या निर्देशांकडे दुर्लक्ष करत सीबीआयच्या टीमला सुरक्षा पुरवण्यात आली नाही. शिवाय त्यांच्यासाठी वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली नाही. याच कारणांमुळे ११ साक्षीदार फुटले.

सीबीआय कँप कार्यालय सर्किट हाऊस येथून हलवत पोलिसांच्या निगराणीखाली काम करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. या प्रकरणात अद्याप १९२ जणांच्या साक्षी नोंदवणे बाकी आहे. प्रकरणात एकूण ३१५ दस्तऐवज व ९४ वस्तू आहेत. ही सर्व सामग्री मोठ्या बॉक्समध्ये ठेवण्यात आली आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाने या प्रकरणी जलद सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना सरकार आणि वकिलांच्या कार्यपद्धतीमुळे सुनावणीत अडथळा येत आहे. आठवडाभरापूर्वी सीबीआयच्या विशेष संचालकांना लिहिलेल्या पत्रात या प्रकरणात प्रभावशाली नेते तुरुंगात असल्यामुळे त्यांना मदत करण्याच्या शक्यतेतून सीबीआय वकिलांच्या टीमला त्रास दिला जात अाहे. त्यामुळे सर्किट हाऊस रिकामे करण्यासाठी दबाव टाकला जाऊ नये यासाठी राज्य सरकारला निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. सीबीआय टीमला सुरक्षा पुरवण्यासोबतच वाहनाचीही व्यवस्था करण्यात यावी.

महिपाल मदरेणासारखे दिग्गज नेते आहेत आरोपी
२०११ मध्ये एएनएन भंवरीदेवीच्या अपहरण व हत्या प्रकरणात तत्कालीन राज्य सरकारने सीबीआयकडे तपास सोपवला. या प्रकरणात १७ आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपींमध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारमधील कॅबिनेट मंत्री महिपाल मदेरणा व तत्कालीन काँग्रेस आमदार मलखान सिंह बिश्नोई, आमदाराचे नातेवाईक व हिस्ट्रीशीटरचा समावेश आहे.

सीबीआय पथकाने विशेष संचालकांना लिहिलेल्या पत्रातील मुख्य अंश
{आरोपींची स्थानिक पोलिसांवर छाप होती. असे असताना सरकार सीबीआय टीम, महत्त्वपूर्ण वस्तू, दस्तऐवज व पुरावे जिल्हा पोलिस विभागाच्या अन्वेषण भवन/ पोलिस गेस्ट हाऊस व ट्रांझिस्ट हॉस्टेलमध्ये स्थलांतरित करू इच्छित आहे.
{ प्रकरणात साक्षीदारांच्या जबाबाआधी त्यांना ब्रीफिंगसाठी बोलवावे लागते. स्थानिक पोलिसांद्वारे साक्षीदारांवर फुटीर होण्याचा दबाव टाकला जाऊ शकतो. त्यामुळे कँप कार्यालय स्थानिक पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर असावे, अन्यथा प्रकरणावर परिणाम होईल.
{ प्रमुख आरोपी साडेचार वर्षांपासून विविध तुरुंगांत बंद आहेत. सरकारी पक्षाचे पथक, साक्षीदार व तपास अधिकाऱ्यांना धमक्या मिळत आहेत. ११ साक्षीदार फुटले आहेत. प्रकरणात १९८ साक्षीदारांपैकी १०६ साक्षीदारांची उलट तपासणी झाली आहे.

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...