आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदेशातील घटनांचीही एनआयएतर्फे चौकशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांबरोबर झालल्या अतिरेकी घटनांच्या चौकशीचा अधिकार लवकरच एनआयएला मिळू शकेल. केंद्र सरकार या प्रस्तावावर विचार करत आहे.
मंगळवारी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी ही माहिती दिली. भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी विचारले होते की, देशाबाहेर राहणाऱ्या भारतीयांविरुद्ध झालेल्या गुन्ह्याच्या चौकशीचा अधिकार एनआयए ला देण्याबाबत सरकार काय करत आहे हे सांगा. एफबीअाय, स्कॉटलंड यार्ड यांच्याशिवाय जर्मनी आणि इस्रायलमधील एजन्सींकडे असे अधिकारही आहेत. १९९५ मध्ये काश्मिरात पर्यटकांच्या अपहरणाशिवाय मुंबई टेरर अटॅक आणि आयसी-८१४ अपहरणांच्या प्रकरणात एफबीआयने वेगळी केस नोंदवून त्याची चौकशी केली होती. या घटनांमध्ये त्यांचे नागरिक मारले गेले होते वा जखमी झाले होते. आता एनआयएलाही तसेच अधिकार मिळावेत यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांचे हे मानणे आहे की, हा प्रस्ताव दुसऱ्या देशाशी अंतर्गत संबंधांवर अवलंबून आहे. एनआयए कलमांत हे संशोधन झाल्यानंतर एजन्सी दुसऱ्या देशांकडून चौकशीची परवानगी मागू शकते.
बातम्या आणखी आहेत...