आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • IPS Officer Has Been Transferred For Reopening The History sheet Of Gazi Fakir

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉंग्रेस आमदाराच्‍या वडीलाची क्राईम हिस्‍ट्री काढणा-या एसपीची बदली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जैसलमर- राजकीय नेत्‍यांच्‍या अवैध धंद्यांना पायबंद घालणा-या तसेच त्‍यांना गैरकृत्‍य करण्‍यास रोखणा-या प्रामाणिक अधिका-यांची मुस्‍कटदाबी करण्‍याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालल्‍याचे दिसत आहे. ग्रेटर नोएडाच्‍या आयएएस दुर्गाशक्‍ती नागपाल यांचे प्रकरण ताजे असतानाच जसैलमरच्‍या एसपींवरही हीच वेळ आली आहे. या घटनांकडे पाहता देशातील अधिकारी कुठल्‍या परिस्थितीत काम करीत आहेत, याची कल्‍पना येईल.

कॉंग्रेस आमदाराशी पंगा घेणे जैसलमरचे एसपी पंकज चौधरींना चांगलेच महागात पडले आहे. पोखरणचे कॉंग्रेसचे आमदार साले मोहम्‍मद यांचे वडील गाजी फकीर यांची हिस्‍ट्रीशीट उघडल्‍यामुळे पंकज चौधरींची बदली करण्‍यात आली आहे. चौधरी यांनी पयर्टन उद्योगाशी निगडीत दलाल आणि स्‍थानिक दारू माफियांविरोधात मोर्चा उघडला होता. संघटीत गुन्‍हेगारी विरोधी कारवाईवरून चौधरी आणि साले मोहम्‍मद यांच्‍यात वादही झाला होता. स्‍थानिक लोकांनी चौधरी यांच्‍या बदलीस विरोध केला आहे. त्‍यासाठी त्‍यांनी जैसलमेर बंद ठेवले आहे. चौ‍धरी यांनी जिल्‍ह्यातील वाढत्‍या अपराधावर नियंत्रण मिळवल्‍याचे लोकांचे म्‍हणणे आहे.